‘तुम्ही दुसरी नोकरी शोधा'; डोनाल्ड ट्रम्प दुसरा सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून कठोर इशारा दिला आहे. त्यांनी पोलंडचे राष्ट्राध्यक्ष करोल नवरोकी यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले. एका पोलिश पत्रकाराने रशियावर कारवाई न केल्याबद्दल विचारणा केल्यावर ट्रम्प संतापले आणि त्यांनी थेट भारतावर टीका केली, ज्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

'मी अजून दुसरा आणि तिसरा टप्पा लागू केला नाही'
पत्रकाराने विचारले, "तुम्ही पुतिनबद्दल नाराजी जाहीर केली, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही." या प्रश्नावर ट्रम्प संतापले. त्यांनी म्हटले की, "तुम्हाला कसे समजले की, मी कोणतीही कारवाई केली नाही? तुम्ही म्हणाल, रशियाकडून तेल खरेदी करणारा चीन सर्वात मोठा देश आहे, मग भारतावर कारवाई करणे योग्य आहे का? पण मी तुम्हाला सांगतो की, शेकडो अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. तरीही तुम्ही म्हणणार कोणतीही कारवाई नाही? मी अजून दुसरा आणि तिसरा टप्पा लागू केला नाहीये."
यादरम्यान, ट्रम्प यांनी पत्रकारांना थेट धमकी दिली, "जर तुम्हाला इतके मोठे नुकसान होऊनही दिसत नसेल, तर मला वाटते की, तुम्ही नक्कीच दुसरी नोकरी शोधली पाहिजे." त्यांचे हे वक्तव्य केवळ पत्रकारांसाठी नव्हते, तर भारत आणि इतर देशांसाठीही एक अप्रत्यक्ष इशारा होता.
भारताला थेट धमकी
ट्रम्प यांनी दोन आठवड्यांपूर्वीच भारताला इशारा दिल्याचे सांगितले. "मी दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट म्हटले होते की, भारत जर रशियाकडून तेल खरेदी करेल, तर त्याला खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे नक्कीच मला याबद्दल विचारू नका," असे ते म्हणाले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, अमेरिकेला भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे मान्य नाही आणि ते यापुढेही भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत राहतील.
ट्रम्प यांनी यापूर्वीच भारताच्या बहुतांश वस्तूंवर ५०% टॅरिफ (आयात शुल्क) लावला आहे. आता ते म्हणतात की, ते अजूनही दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कारवाई करू शकतात. अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाचे मोठे नुकसान होत असले, तरी भारताने अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे.
पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष
ट्रम्प प्रशासनाची ही धमकी भारतासाठी एक नवीन आव्हान आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला सार्वभौम अधिकार राखूनही भारताने आपली ऊर्जा सुरक्षा जपली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प भारतावर पुढील कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारताला आर्थिक आणि राजनैतिक पातळीवर याचे काय परिणाम भोगावे लागतात, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
-
BCCI चा मोठा निर्णय! जसप्रीत बुमराह ठरला टीम इंडियाचा 'सर्वात महागडा' खेळाडू! कमाईत विराट-रोहित मागे -
41व्या वर्षी आई होणार बनू मैं तेरी दुल्हन फेम दिव्यांका त्रिपाठी! उशीरा गर्भधारणेत फॉलो करा या टीप्स -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा










Click it and Unblock the Notifications