डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक गर्जना! घुसखोरांना इशारा, चीनला कडक संदेश; वाचा भाषणातील 5 मोठे मुद्दे
Donald trump state of the union speech 2026 highlights : "सत्तासंघर्ष, व्यापारातील टॅरिफ युद्ध आणि सीमेवरील सुरक्षा... अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वार्षिक भाषणात देशाच्या भविष्यातील वाटचालीचा जणू नकाशाच जगासमोर ठेवला. वेनेझुएलाच्या तेलावर ताबा मिळवण्यापासून ते देशांतर्गत 'DEI' धोरणे मोडीत काढण्यापर्यंत ट्रम्प यांनी घेतलेले धाडसी निर्णय केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करणारे ठरणार आहेत."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेत (स्टेट ऑफ द युनियन) आपले बहुचर्चित भाषण ठोकले. ट्रम्प यांनी आपल्या चिरपरिचित आक्रमक शैलीत 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा पुनरुच्चार करत जागतिक व्यापार, इमिग्रेशन आणि ऊर्जा क्षेत्राबाबत अत्यंत कठोर भूमिका मांडली आहे. "आता अमेरिकेला जिंकण्याची सवय झाली आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना आणि जगाला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली.

ट्रम्प यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
१. 'ड्रिल, बेबी, ड्रिल' आणि व्हेनेझुएलाचा तेल साठा
ऊर्जा क्षेत्रावर भाष्य करताना ट्रम्प यांनी वेनेझुएलाकडून मिळालेल्या ८० दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेलाचा उल्लेख केला. निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर त्यांनी वेनेझुएलाला 'नवा मित्र' म्हटले असून, अमेरिकेला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी तेल उत्खनन ऐतिहासिक उंचीवर नेल्याचा दावा केला.
२. व्यापार युद्ध आणि 'टॅरिफ'ची शिक्षा
जे देश अमेरिकेसोबतचे व्यापारी करार मोडतील, त्यांना 'भयानक शिक्षा' दिली जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर टॅरिफ (सीमा शुल्क) धोरणांबाबत त्यांनी घेतलेली भूमिका जागतिक व्यापारात मोठी खळबळ उडवून देणारी ठरू शकते.
३. DEI प्रोग्रामचा अंत
ट्रम्प यांनी 'डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इंक्लुजन' (DEI) प्रोग्राम पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली. फेडरल एजन्सी, लष्करी संस्था आणि विद्यापीठांमधून हे धोरण हटवणे ही आपली मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.
४. अवैध घुसखोरीवर कडक प्रहार
मेक्सिको बॉर्डरवरील सुरक्षेबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, "आम्ही लोकांना कायदेशीर मार्गाने येऊ देऊ, पण अवैध घुसखोरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही." वॉशिंग्टन डीसी आज सर्वात सुरक्षित शहर असल्याचे सांगत त्यांनी लवकरच लॉस एंजेलिसमध्येही तशीच सुरक्षा व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
५. चीनला थेट इशारा
हाँगकाँगमधील मानवाधिकार कार्यकर्ता जिमी लाई यांची मुलगी क्लेअर लाई हिची संसदेतील उपस्थिती हा चीनसाठी मोठा संदेश मानला जात आहे. यातून अमेरिका चीनमधील मानवाधिकारांच्या मुद्द्यावर मागे हटणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : India's Export Jumps: झंडा ऊंचा रहे हमारा! US टॅरीफ पाॅलिसी फेल, आव्हानं पेलून भारताची निर्यातीत झेप












Click it and Unblock the Notifications