PM मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिलं! डोनाल्ड ट्रम्पंचं खळबळजनक वक्तव्य
Donald Trump say pm modi assured india will stop buying russian oil : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) मोठे आणि महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून रशियाकडून होणारी तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मॉस्कोवर जागतिक दबाव वाढवण्याच्या प्रयत्नांतील हे "एक मोठे पाऊल" असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.
हिंसक गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांच्या प्रशासनाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यासाठी ओव्हल ऑफिसमध्ये एफबीआय संचालक काश पटेल यांच्यासमवेत आयोजित पत्रकार परिषदेत ट्रम्प बोलत होते.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "होय, नक्कीच. ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) माझे मित्र आहेत. आमचे उत्तम संबंध आहेत... भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मी खूश नव्हतो आणि त्यांनी आज मला आश्वासन दिले आहे की, ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. हे एक मोठे पाऊल आहे. आता आपल्याला चीनलाही तेच करायला लावावे लागेल..."
भारत आणि रशिया संबंधांवर टिप्पणी
रशियन तेलाची खरेदी करणे भारताच्या आर्थिक स्थिरतेसाठी आवश्यक आहे, असे भारत सरकार दीर्घकाळापासून सांगत आहे. वॉशिंग्टनने भारताला आपले ऊर्जा स्रोत बदलण्याचे आवाहन सातत्याने केले असले तरी, भारताने आपल्या राष्ट्रीय हिताचे धोरण कायम ठेवले होते. मात्र, आता ट्रम्प यांच्या दाव्यानुसार या धोरणात बदल होण्याची शक्यता दिसत आहे.
रशिया युक्रेन संघर्षावर टीका
ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर टीका केली आणि ते अनावश्यक असल्याचे म्हटले. "हे युद्ध कधीच सुरू व्हायला नको होते. हे युद्ध रशियाने पहिल्या आठवड्यात जिंकले पाहिजे होते, पण ते चौथ्या वर्षात (संघर्षाच्या) प्रवेश करत आहेत. आणि मला हे थांबलेले पाहायचे आहे," असे ट्रम्प म्हणाले.
भारताचे धोरण, तेल खरेदीवर भुमिका
भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की रशियन तेलाची खरेदी ही राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता यावर आधारित आहे. ती गरज आहे आणि भारत कधीही त्यांच्या ऊर्जेच्या आवश्यकतेसंदर्भात तडजोड करणार नाही हे अमेरीकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सडेतोड उत्तर होते.
ट्रम्प यांच्या वक्तव्याला आधार काय?
प्राप्त माहितीनिसार, भारताने आज १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत, भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याबाबत कोणतेही धोरण बदलल्याचे किंवा अधिकृत घोषणा केल्याचे वृत्त नाही, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पंचे म्हणणे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याला तूर्त काही आधार आहे हे दिसत नाही.












Click it and Unblock the Notifications