भविष्यात क्रिप्टो चलन पुन्हा लोकप्रिय होऊ शकते! डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं हे मोठं वक्तव्य, वाचा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी नॅशविले येथे बिटकॉइन 2024 परिषदेत भाषण केले. त्यावेळी त्यांनी क्रिप्टो करन्सी आणि बिटकॉईनबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यानंतर असे मानले जाते की भविष्यात क्रिप्टो चलन पुन्हा एकदा लोकप्रिय होऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की बिटकॉइन नाकारता येणार नाही. व्हाईट हाऊसमध्ये परत आल्यास अमेरिका क्रिप्टोकरन्सीचे जागतिक केंद्र बनेल, असा ट्रम्प यांचा विश्वास आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी ट्रम्प यांनी क्रिप्टोला पैसा मानण्यास नकार दिला होता, मात्र आता त्यांच्या भूमिकेत बदल झाला आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर ते व्हाईट हाऊसमध्ये परतले तर ते अमेरिकेला "बिटकॉइन महासत्ता" बनवण्याचे काम करतील. ट्रम्प क्रिप्टोकरन्सी उद्योगासाठी सल्लागार परिषद तयार करण्याचा विचार करत आहेत. ते म्हणतात की ते क्रिप्टोकरन्सी उद्योगासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल.
उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची अध्यक्षपदी निवड झाल्यास बिटकॉइन गुंतवणूकदारांचे नुकसान होईल, डेमोक्रॅट्स तुम्हाला व्यवसायातून बाहेर ठेवू इच्छितात,मात्र आम्ही हे होऊ देणार नाही.
माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, जर क्रिप्टो भविष्याची व्याख्या करणार असेल तर त्याचे खाणकाम आणि उत्पादन अमेरिकेत व्हावे अशी माझी इच्छा आहे. स्पष्टता आणि निष्पक्षता या उद्देशाने उद्योगाला पाठिंबा देणाऱ्यांकडून भविष्यातील नियमावली तयार केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
अमेरिका श्रीमंत होईल असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. बिटकॉइनचा डॉलरला कोणताही धोका नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.सध्याच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना ट्रम्प म्हणाले, विनाकारण खर्च आणि अनियंत्रित चलनवाढ आर्थिक अस्थिरतेला जबाबदार आहे. खुल्या सीमा आणि बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी कल्याणकारी योजना संसाधनांवर अधिक दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.












Click it and Unblock the Notifications