Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लग्न, घटस्फोट आणि रंजक प्रेम कहानी

Donald Trump Love Story & Life: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने चर्चेचा विषय असतो. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीवरून किंवा त्यांच्या लव्हस्टोरीवरून त्यांच्यावरून चर्चा सुरूच असते.

Donald trump

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेंसिल्वेनिया एका निवडणूक रॅलीत जीवघेणा हल्ला झाला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. हल्लेखोर थॉमस मैथ्यू क्रुक्स याला सुरक्षा रक्षकांनी जागेवरच ठार केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाजगी जीवनावर देखील चर्चा सुरु आहे. प्रचंड श्रीमंत असलेल्या ट्रम्प यांच्या खाजगी जीवनातील रहस्य आश्चर्यचकीत करणारी आहेत. त्यांच्या खाजगी जीवनावरुन नेहमी चर्चा सुरु असते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार आणि घरात स्फोटके

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांच्यावर एका माथेफिरुने हल्ला केला होता. त्याच्या घरी स्फोटकं सापडली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव रंगेल असल्याने ते प्रसिद्ध आहेत. त्याचे अनेक महिलांशी संबंध होते. त्याकारणाने त्यांना बऱ्याच कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या आहेत. ते राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत उमेदवार आहेत. जेथे त्यांच्यावर गोळीबार झाला तेथील अनेक व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.अमेरिकन सर्व्हीस सीक्रेच एजन्सीने ते सुरक्षित असल्याचा म्हटले आहे.यापूर्वी अनेक वादात ते सापडले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे पहिले लग्न

डोनाल्ड ट्रम्प त्यांचे खाजगी जीवन आणि संपत्तीबाबत अनेक रहस्यं आहेत. साल 1977 मध्ये 31 वर्षांचे असताना ट्रम्प यांनी इवाना यांच्याशी लग्न केले होते. इवाना यांच्यापासून डोनाल्ड यांना इवांका,एरिक आणि डोनाल्ड ज्युनिअर अशी तीन मुले झाली. इवाना ट्रम्प ऑर्गेनायझेशनमध्ये इंटेरिअर डिझाईनचे व्हाईस प्रेसिडेन्ट पद सांभाळले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांचे दुसरे लग्न आणि घटस्फोट

खाजगी जीवनात आणि संपत्तीबाबत अनेक गुप्त गोष्टी उघडकीस आल्या आहेत. साल 1977 मध्ये 31 वर्षांच्या ट्रम्प यांनी इवाना यांच्याशी लग्न केले. 14 वर्षांनंतर साल 1991 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.नंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे मार्ला मेपल्स हीच्याशी अफेअर सुरु झाले. या दोघांना मुलगी ( टिफनी ) झाल्यानंतर त्यांनी साल 1993 मध्ये मार्लाशी दुसरा विवाह केला. 1997 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्ला यांनाही घटस्फोट दिला.

तिसरी प्रेम कहानी आणि लग्न

त्यानंतर मेलानिया त्यांच्या जीवनात आली. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांची 1998 साली न्यूयॉर्क येथील एका फॅशन पार्टीमध्ये भेट झाली. त्यानंतर त्यांची प्रेम कहानी सुरू झाली आणि दोघांनी 22 जानेवारी 2005 रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाला बिल आणि हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक मान्यवर आले होते. त्या दोघांना 2006 मध्ये मुलगा झाला आणि त्याचे नाव बॅरन ट्रम्प ठेवले. मुलगा चार महिन्याचा असताना डोनाल्ड ट्रम्प यांचे खरे रूप मेलानियाला कळले. जुलै 2006 मध्ये ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅलीयल्सी संबंध ठेवल्याचा आरोप केला. त्यानंतर प्लेबॉय मॉडर्न तिच्याशी देखील त्यांचे अफेअर असल्याची चर्चा सुरू होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन लग्न केले, एकूण पाच मुले झाली,दोन घटस्फोट घेतले अशी त्यांची प्रेम कहाणी आहे.

जगातील 500 श्रीमंताच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती हा देखील वादाचा विषय ठरला होता. जगातील 500 श्रीमंतांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे

डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रेम, लग्न त्यांची मुले, त्यांची संपत्ती किंवा नुकत्याच काही दिवसापूर्वी त्यांच्यावर झालेला गोळीबार. अशा एक ना अनेक गोष्टींमुळे डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने चर्चेचा विषय असतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+