Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आजची रात्र जगासाठी निर्णायक? अमेरिकेच्या 'विनाशकारी' विमानाने नेब्रास्का तळ सोडला, नेमकं काय घडतंय?

मध्य पूर्वेतील तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या थेट इशाऱ्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. इराणला अवघ्या काही तासांत उद्ध्वस्त करण्याची क्षमता अमेरिकेकडे असून, ही कारवाई आज रात्रीही होऊ शकते, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे.

donald trump iran war doomsday plane nightwatch marathi news

ट्रम्प यांच्या या विधानाला केवळ पोकळ धमकी न मानता, अमेरिकेच्या प्रत्यक्ष लष्करी हालचालींनी या चिंतेत भर घातली आहे. अमेरिकेचे अण्वस्त्र युद्धासाठी सज्ज मानले जाणारे विशेष 'डूम्सडे प्लेन' (E-4B Nightwatch) नेब्रास्का येथील हवाईतळावर घिरट्या घालताना दिसल्याने अणू युद्धाची टांगती तलवार जगावर निर्माण झाली आहे. हे विमान विशेषतः अणू युद्धाच्या प्रसंगी कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून वापरले जाते, ज्यामुळे या हालचाली अत्यंत गंभीर मानल्या जात आहेत.

दुसरीकडे, इराणने अमेरिकेच्या या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेच्या अशा धमक्यांना इराणमधील लहान मुलेही घाबरत नाहीत, अशी टीका करत इराणने ट्रम्प यांच्या विधानाची थट्टा उडवली आहे. "आजच्या रात्रीची आम्हाला प्रतीक्षा आहे," असे खुले आव्हान देत इराणने कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, इराणमधील अंतर्गत परिस्थिती सध्या गोंधळाची असल्याचे चित्र आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या दाव्यानुसार, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी सध्या कोमात असून त्यांच्यावर कोम शहरात उपचार सुरू आहेत. मोजतबा यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते सार्वजनिक रित्या समोर न आल्याने आणि अमेरिका त्यांना देश चालवण्यास असमर्थ ठरवत असल्याने इराणच्या राजकीय स्थिरतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या युद्धाची पार्श्वभूमी गेल्या काही महिन्यांपासून तयार होत होती. २०२५ च्या सुरुवातीपासूनच इस्रायल आणि अमेरिकेने इराणला त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत वारंवार इशारा दिला होता. मात्र, इराणने या इशाऱ्यांना केराची टोपली दाखवत आपली क्षेपणास्त्र क्षमता आणि अणू कार्यक्रम सुरूच ठेवला. अखेर, इराणचा हा अट्टाहास पाहून अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर थेट हल्ले चढवले, ज्यामुळे ३९ दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अमेरिकेची लष्करी शक्ती आणि इराणचा आक्रमक प्रतिवाद यामुळे आजची रात्र जगासाठी खरोखरच निर्णायक ठरणार का, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+