Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ: भारत इराणऐवजी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार? ट्रम्पांचा मोठा दावा

Donald Trump India Oil Deal : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडवून देणारे एक खळबळजनक विधान केले आहे. "भारत आता इराणकडून तेल खरेदी न करता व्हेनेझुएलाकडून तेल आयात करेल," असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

वॉशिंग्टन डीसी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा करार आधीच अंतिम झाल्याचे संकेत दिले असून चीनलाही अशाच प्रकारचा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहे.

Donald Trump India Oil Deal

ट्रम्प यांचा दावा आणि कराराची पार्श्वभूमी

एअर फोर्स वनवर पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आम्ही भारतासोबतचा हा करार अंतिम केला आहे. भारताची तेल खरेदी आता इराणऐवजी व्हेनेझुएलाकडे वळवण्यात आली आहे."

विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी चीनलाही व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याचे सुचवले आहे, ज्यामुळे जागतिक तेल बाजारातील इराणचे महत्त्व कमी करण्याचा अमेरिकेचा इरादा स्पष्ट दिसत आहे.

या संदर्भात भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, नुकत्याच झालेल्या राजनैतिक हालचाली या विधानाला पुष्टी देणाऱ्या ठरत आहेत.

पीएम मोदी अन् व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांची चर्चा!

ट्रम्प यांच्या विधानाच्या दोन दिवस आधीच, म्हणजेच 30 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलाच्या कार्यकारी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली.

दोन्ही नेत्यांनी ऊर्जा क्षेत्रासह विविध क्षेत्रांत भागीदारी अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शविली. येणाऱ्या काळात दोन्ही देशांमधील संबंधांना नवीन उंचीवर नेण्यासाठी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पंतप्रधान मोदींनी पोस्ट करत विश्वास व्यक्त केला होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजची महत्त्वाची भूमिका!

भारतातील दिग्गज खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज या घडामोडीत केंद्रस्थानी आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रिलायन्सने व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र आणि ट्रेझरी विभागाकडे परवानगी मागितली आहे.

रशियावरील तेलाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी पाश्चात्य देशांकडून भारतावर दबाव वाढत असताना, रिलायन्स पर्यायी मार्ग शोधत आहे. गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे रिफायनरी कॉम्प्लेक्स असलेल्या रिलायन्सने २०२५ च्या सुरुवातीला दररोज सरासरी 63,000 बॅरल तेल व्हेनेझुएलातून आयात केले होते.

भारतासाठी हे का महत्त्वाचे आहे?

इराणवर अमेरिकेचे नेहमीच कडक निर्बंध राहिले आहेत. अशा परिस्थितीत, जर भारताने व्हेनेझुएलातून तेल खरेदी करण्याचा मोठा करार केला.

  • ऊर्जा सुरक्षा: भारताला रशिया आणि मध्य-पूर्वेतील देशांव्यतिरिक्त एक मोठा पर्याय उपलब्ध होईल.
  • राजनैतिक संतुलन : अमेरिकेसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि निर्बंधांच्या धास्तीशिवाय तेल आयात करता येईल.
  • दर नियंत्रण : व्हेनेझुएलाकडे मोठा साठा असल्याने स्पर्धात्मक दरात तेल मिळण्याची शक्यता वाढेल.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+