काय सांगता..? प्रचार रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला कचऱ्याचा ट्रक; पहा नेमकं काय झालं...
US Presidential Election 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प व कमला हॅरिस यांच्यात दुहेरी लढत होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचाराची स्टाईल जरा जास्तच चर्चेत आली.
डोनाल्ड ट्रम्प बुधवारी कचऱ्याचा ट्रक चालवताना दिसले. विस्कॉन्सिनला आयोजित रॅलीसाठी त्यांनी हा कचऱ्याचा ट्रक नेल्याने एकच चर्चा झाली. बांधकाम कामगारासारखे जॅकेट घालत त्यांनी स्वतः हा ट्रक चालवला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही ट्र्म्प यांनी समर्पक उत्तरे दिली.

कचऱ्याच्या ट्रकची कल्पना नेमकी काय?
ट्रम्प समर्थक म्हणून ओळखले जाणारे विनोदी कलाकार टोनी हिंचक्लिफ यांनी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे एका रॅलीदरम्यान वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी पोर्तो रिकोचे वर्णन 'कचऱ्याचे बेट' असे केले होते. त्यानंतर याला प्रतिउत्तर म्हणून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना 'कचरा' असे संबोधले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी थेट कचऱ्याचा ट्रक आणत बायडेन यांना पुन्हा डिवचले. पत्रकारांशी बोलताना ट्र्म्प म्हणाले की, "हा ट्रक कमला आणि जो बिडेन यांच्या सन्मानार्थ आहे. तो तुम्हाला कसा वाटला असा प्रश्न करत ट्रम्प पुढे म्हणाले, "जो बिडेन यांचे विधान खरोखरच अपमानास्पद आहे."
जो बिडेन ट्रम्प समर्थकांना 'कचरा' म्हणतात
टोनी हिंचक्लिफच्या या विधानानंतर चांगलाच वाद वाढला होता. टोनी यांची ही टिका असभ्य आणि वर्णद्वेषी असल्याचा आरोप लॅटिनो समुदायाने केली होती. पोर्तो रिकोचे रहिवासी हा या निवडणुकीत एक महत्त्वाचा मतदार गट आहे. बायडेन यांनी मंगळवारी पोर्तो रिकन समुदायाशी पुन्हा संवाद साधला. त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. त्याच भाषणात त्यांनी ट्रम्प यांच्या समर्थकांना कचरा हा शब्दप्रयोग केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती!
ट्रम्प व बायडेन यांच्यात सध्या वाद-प्रतिवाद सुरु आहे. बायडेन यांच्या वक्त्व्यानंतर ट्रम्प थेट कचऱ्याची ट्रक घेऊन प्रचार करताना दिसले. या निवडणुकीच्या प्रचारात ट्रम्प यांची अनोखी शैली दिसली. मतदारांनाव व समर्थकांना एकत्र आणण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या प्रचार रॅलीत वेवगेवगळ्या क्लुप्त्या केलेल्या दिसल्या. बर्गर रेस्टॉरंटमध्ये बर्गर सर्व्ह करताना ट्रम्प यांना अलीकडे वेटर म्हणूनही पाहिले गेले.












Click it and Unblock the Notifications