शपथविधीच्या 11 दिवसानंतर डोनाल्ड ट्रम्प उठले भारतीयांच्या मुळावर; 1700 भारतीयांना अटक

अमेरिकेची सूत्रे हातात येऊन ११ दिवस उलटत नाहीत तोच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीयांच्या मुळावर उठले आहेत. ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर 11 दिवसांत 25 हजाराहून अधिक अवैध स्थलांतरितांना ताब्यात घेतले. ट्रम्प यांच्या आईस टीमने (इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट) 12 राज्यांमध्ये छापे टाकले. वृत्तानुसार, सर्वाधिक छापे रिपब्लिकन राज्यांमध्ये झाले आहेत. यापैकी 1700 अवैध स्थलांतरित भारतीयांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Donald Trump

18 हजार भारतीयांची हद्दपारी

डोनाल्ड ट्रम्प यांनी 1700 अवैध स्थलांतरित भारतीयांना ताब्यात घेतले. त्यापूर्वी 18 हजार अवैध अनिवासी भारतीयांची हद्दपारीची यादी तयार केली. या काळात मेक्सिको सीमेवरून घुसखोरीच्या घटनांमध्ये 64 टक्के घट झाली. बिडेन यांच्या कार्यकाळात यावर्षी 1 ते 19 जानेवारी दरम्यान दररोज सरासरी 2087 घुसखोरीच्या घटना घडल्या, तर ट्रम्प यांच्यानंतर या वर्षी 20 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत दररोज सरासरी केवळ 126 घुसखोरीच्या घटना घडल्या.

स्थलांतरितांत भारत चौथ्या स्थानी

ट्रम्प सरकारच्या ताज्या कारवाईत अटकेत असलेल्या अवैध स्थलांतरितांच्या संख्येत भारतीय चौथ्या क्रमांकावर आहेत. मेक्सिकोच्या सर्वाधिक 9,226 अवैध स्थलांतरितांना पकडले आहे. दुसऱ्या स्थानावर हैतीचे 7600 बेकायदेशीर स्थलांतरित होते. तिसऱ्या स्थानावर निकारागुआचे 4,800 अवैध स्थलांतरित होते. अमेरिकेत 11 दशलक्ष अवैध स्थलांतरित आहेत. सर्वाधिक 40 लाख मेक्सिकन आहेत. तर चौथ्या क्रमांकावर 7.25 लाख भारतीय आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+