भारतीय वंशाचे काश पटेल असणार FBI नवे संचालक; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
Kash Patel : अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) चे संचालक क्रिस्टोफर ए. रे यांच्या जागी काश पटेल यांची नियुक्तीची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी रोजी यूएस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर भारतीय वंशाचे काश पटेल हे एफबीआयचे पुढील संचालक असणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी वेळेनुसार शनिवारी काश पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. "कश्यप 'काश' पटेल फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) चे पुढील संचालक म्हणून काम करतील हे जाहीर करताना मला अभिमान वाटतो," ट्रम्प यांनी शनिवारी रात्री त्यांच्या सोशल मीडिया वेबसाइट ट्रुथ सोशलवर लिहिले आहे".

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "काश हे एक हुशार वकील, तपास अधिकारी आणि 'अमेरिकन फर्स्ट' योद्धा आहेत. ज्यांनी भ्रष्टाचार उघड करण्यासाठी, न्यायाचे रक्षण करण्यासाठी आणि अमेरिकन लोकांचे रक्षण करण्यात आपली कारकीर्द व्यतीत केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, एफबीआय, "गुन्हेगारी संपेल, स्थलांतरित गुन्हेगारी टोळ्यांचा नाश आणि सीमेपलीकडील मानवी आणि अंमली पदार्थांची तस्करी थांबवा थांबेल."
Just in: Trump nominates Indian origin Kashyap “Kash” Patel as FBI Director pic.twitter.com/2hNrUgh1pQ
— Sidhant Sibal (@sidhant) December 1, 2024
डोनाल्ड ट्रम्प यांना एफबीआयवर पूर्ण नियंत्रण हवे आहे. त्यांना काश पटेल यांच्यापेक्षा अधिक निष्ठावान आणि योग्य उमेदवार मिळणे कठीण होते. काश पटेल यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधीच्या कार्यकाळात ते देशाच्या संरक्षण सचिवांचे सल्लागार होते. पण काश पटेल यांच्या नियुक्तीच्या मार्गात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींविरुद्धची त्यांची भूमिका खूप वादग्रस्त राहिली आहे.
काश पटेल यांनी यापूर्वी एफबीआयचे वॉशिंग्टन मुख्यालय बंद करण्याचे, त्याचे नेतृत्व काढून टाकण्याचे आणि "देशाच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना नियंत्रणात आणण्याचे आवाहन केले होते," असे न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले आहे. त्यांनी एफबीआयची गुप्तचर माहिती गोळा करण्याचे कार्य काढून टाकण्याची आणि ट्रम्पला पाठिंबा न देणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची सूचना देखील केली होती.
काश पटेल यांचं गुजरातशी आहे खास कनेक्शन
25 फेब्रुवारी 1980 रोजी गार्डन सिटी न्यूयॉर्क येथे गुजराती भारतीय कुटूंबामध्ये जन्मलेल्या काश पटेल यांनी रिचमंड विद्यापीठातून बॅचलरची पदवी घेतली आहे. नंतर त्यांनी पेस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून ज्युरीस डॉक्टरची पदवी प्राप्त केली. 44 वर्षीय काश पटेल यांनी 2017 मध्ये तत्कालीन ट्रम्प प्रशासनाच्या शेवटच्या काही आठवड्यांत अमेरिकेचे संरक्षण सचिवांचे 'चीफ ऑफ स्टाफ' म्हणून काम केले होते. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेले पटेल गुजरातचे आहेत. मात्र त्याची आई पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथील असून वडील युगांडाचे आहेत. ते 1970 मध्ये कॅनडातून अमेरिकेत आले. पटेल यांनी यापूर्वी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत 'आम्ही गुजराती आहोत' असे म्हटलं होतं.












Click it and Unblock the Notifications