न्युझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वःतचा न्यूड फोटो! काय आहे प्रकरण ? जाणूुन घ्या
Deepfake new zealand mp laura mcclure shows her ai generated nude photo : न्युझीलंडच्या महिला खासदाराने स्वःतचा न्यूड फोटो अस्पष्ट करुन संसदेत सभागृहासमोर दाखवला. यानंतर महिला खासदाराने या फोटोबद्दल आपले तडाखेबंद मतंही सर्वांसमोर व्यक्त केले आणि तो कसा तयार केला याची माहिती दिली.
आता हे प्रकरण नेमके काय आहे? महिला खासदाराने स्वतःचाच न्यूड- अस्पष्ट फोटो का दाखवावा याचे मुख्य कारणही खूप गंभीर आहे, आणि ही गंभीरता समोर आणण्यासाठी महिला खासदाराने हे धाडसी पाऊल उचलले. हे प्रकरण आपण जाणून घेऊया.

5 मिनिटांतच तयार केला फोटो!
न्यूझीलंडच्या ACT पक्षाच्या सदस्या लॉरा मॅकल्युर यांनी गुगल सर्चद्वारे सापडलेल्या वेबसाइटचा वापर करून काही मिनिटांत स्वतःचा डीपफेक तयार केला. 14 मे रोजी संसदेच्या अधिवेशनादरम्यान वादविवाद सुरू झाला; तेव्हा लॉराने त्यांचा तोच फोटो अस्पष्ट केला आणि तो सर्वांना दाखवला. त्यांनी संसदेत म्हटले की, "हा माझा नग्न फोटो आहे, पण तो खरा नाही. डीपफेक म्हणून माझा फोटो तयार करण्यासाठी मला पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला."
खासदाराचा कशासाठी हा सारा खटाटोप?
मुळ मुद्दा डीपफेकचा आहे आणि त्याचे गांभीर्य कळावे यासाठी मोठ्या धैर्याने आणि गंभीररित्या लाॅरा यांनी स्वतःवरच हा प्रयोग करुन दाखवला. यावेळी संसदेत लॉरा यांनी म्हटलेल्या या एका ओळीमुळे न्यूझीलंड आणि पश्चिम आणि आशियामध्ये एआयद्वारे डीपफेकच्या धोक्यांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
'डिपफेक तयार करणे सोपे आहे' - खासदार लाॅरा
नंतर सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये बोलताना लॉरा म्हणाल्या, "डिपफेक तयार करणे किती सोपे आहे, किती सहज करता येते आणि डिपफेक विशेषतः आपल्या तरुण न्यूझीलंडवासीयांसाठी आणि आपल्या तरुणींसाठी किती हानीकारक आहे, यासाठी मी संसदेच्या इतर सर्व सदस्यांचे लक्ष वेधले. " असे त्या म्हणाल्या.
"तंत्रज्ञानाचा गैरवापर ही समस्या! कायदे करण्याची गरज" - लाॅरा
लाॅरा यांनी म्हटले की, जे तंत्रज्ञान बनले त्याचा गैरवापर होत आहे. डिपफेक लोकांना त्रास देण्यासाठी केला जात आहे, म्हणून, आपल्याला यावर कायदे करण्याची आवश्यकता आहे."
"फोटो दाखवण्याआधी घाबरले, तरीही..."
खासदार मॅकल्युर म्हणाल्या की, फोटो दाखवण्याआधी मी पूर्णपणे घाबरले, परंतु मला वाटले की, डीपफेकचा बळी होऊ नये म्हणून नवीन कायदे लागू करणे आवश्यक आहे. सायबरशी निगडीत आणि डिजिटल कम्युनिकेशनसाठी आणि आणि छळासाठी काही नियम अस्तित्वात आहेत पण तेपुरेसे नाहीत, खरं तर, न्यूझीलंडमधील प्रचलित कायद्यात डीपफेक थेट येत नाही हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो.
लॉरा यांनी उचलले हे पाऊल..
लॉरा आता डीपफेक डिजिटल हानी आणि शोषण विधेयकाच्या प्रस्तावाला पाठिंबा देत आहे. पॉर्न आणि व्यक्तिगत गोष्टींचे रेकॉर्डिंग यांबाबतचे विद्यमान कायद्यांना धार आणेल. यामुळे संमतीशिवाय डीपफेक तयार करणे किंवा शेअर करणे हा गुन्हा ठरु शकेल. यामुळे अशा गोष्टींना आळा बसू शकेल आणि पीडितांना इंटरनेटवरून पोर्नोग्राफिक सामग्री काढून टाकण्याचे आणि खटल्यांमध्ये न्याय मिळवण्याचे मार्ग देखील मिळू शकतील अशी लाॅरा यांची धारणा आहे.












Click it and Unblock the Notifications