मोठी बातमी : WhatsApp युजर्सवर सायबर अॅटॅक! अनेकांचे अकाऊंट हॅक!
Cyber attack on WhatsApp users : WhatsApp हे जगात सर्वात लोकप्रिय असलेले अॅप आहे. या अॅपचा सर्वात जास्त वापर जगात होता. त्यामुळेच हे अॅप एवढे महत्वाचे आहे. पण एक वाईट बातमी आता समोर येत आहे. WhatsApp युजर्सवर सायबर अॅटक झाला असून अनेकांचे अकाऊंट हॅक झाले आहेत, यासंदर्भात Meta ने कन्फरमेशन दिले आहे.
प्राप्त माहितीनुसार, इस्त्रायलीची स्पायवेइर कंपनी पॅरागाॅन सोल्यूशनकडून साॅफ्टवेअरवर प्रगत तंत्राचा वापर करुन अनेक युजर्संना टार्गेट करण्यात आले, असे आरोप लागले आहेत. यासंदर्भात आपण आता जाणून घेऊया.

मेटाने सायबर अॅटॅकसंदर्भात आरोप केला की, पॅरागाॅनचे गोपनिय Graphite या साॅफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. WhatsApp चे मालक आणि मेटाने स्पष्ट केले की, या सायबर अॅटॅकमध्ये जवळपास 90 लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे.
पत्रकारांचे वाॅट्सअॅप हॅक
मेटाकडून स्पष्ट करण्यात आले की, अॅटॅकर्संनी काही मोजक्या लोकांना लक्ष्य केले आहे, त्यात काही महत्वाच्या व्यक्ती आणि पत्रकारांचा समावेश आहे त्यांना लक्ष्य करण्यात आले असून 90 लोक हे वेगवेगळ्या 20 देशांचे आहे.
जीमेलकडून युजर्संना सावधगिरी बाळगण्याची सूचना
जीमेलचे अडीच हजार कोटी वापरकर्ते आहेत. जीमेलने आपल्या युजर्संना अशा सायबर हल्ल्यापासून सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. युजर्संच्या जीमेलवर महत्वाची संवेदनशील माहिती असते त्यामुळे अशा हल्ल्यात जीमेल युजर्स सापडले तर मोठे नुकसान होऊ शकते. हल्ल्यामुळे आर्थिक हानीही होण्याची शक्यता असते.
रिपोर्टनुसार, हा अॅटॅक झिरो क्लिक म्हणून ओळखला जात असल्याचे वृत्त आहे. पॅरागॉन सोल्युशनचा ग्रेफाइट प्रत्यक्षात झिरो क्लिक तंत्रावर काम करते म्हणजेच युजर्सने क्लिक जरी नाही केले तरीही ते डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकते आणि डेटा हॅक करण्याची क्षमता त्यात असते. विशेष म्हणजे यात मोबाईल युजर्संना काहीही कल्पना नसते.
-












Click it and Unblock the Notifications