न्यूयाॅर्कमध्ये राम मंदिराच्या देखाव्यावरुन वाद, मुस्लिम संघटनांनी घेतला आक्षेप
New York India Day Parade : न्यूयाॅर्क शहरात आयोजित केल्या जाणा-या इंडिया डे परेडच्या निमित्ताने राममंदिराच्या देखावा असलेल्या कार्निव्हल फ्लोट मुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. अनेक समुदायांनी म्हटले आहे की, हा देखावा मुस्लिमविरोधी असून कार्यक्रमातून हटविला पाहिजे.
फ्लोटमध्यें राम मंदिर दाखवण्यात आले आहे. या वर्षी भारतात जेव्हा अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन केले तेव्हा संपूर्ण अमेरिकेत देखील भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. परंतू राम मंदिर स्थळ, हे खूप वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कटु वादाचा मुद्दा राहिलेला आहे. 1990 च्या दशकात तेथील एक मशीद पाडण्यात आली होती.

काही अमेरिकन संघटनांनी न्युयाॅर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स आणि न्यूॅर्याकचे गव्हर्नर कॅथी होचुल यांना पत्र लिहू हा देखावा मुस्लिमविरोधी असल्याचे म्हटले आहे. तसेच हा देखावा म्हणजे मशिद पाडल्याच्या अभिमान प्रतित करतो. पत्रालर सही करणा-या समुहांत काउंसिल आॅन अमेरिकन इस्लामिक रिलेशन, इंडियन अमेरिकन मुस्लिम काऊंसिल आणि हिंदू फाॅर ह्युमन राईट्सचा समावेश आहे. पत्रात म्हटले आहे की, हा या देखाव्याद्वारे हिंदू राष्ट्रवादी विचारधारेला भारतीय ओळखी म्हणून जोडण्याची समूहाची इच्छा दर्शविली जात आहे पण भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे.
देखाव्याचे आयोजन करणा-या विश्व परिषद ऑफ अमेरिकेचे म्हणणे आहे की, हा देखावा एका हिंदू पूजास्थळाचा प्रतिनिधित्व करतो आणि याचा उद्देश भारतीय आणि हिंदू ओळखीचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून ओळखल्या जाणा-या देवाचा गौरव करतो. मात्र हिंद अमेरिक फाउंडेशनने म्हटले की, हा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा एक अभ्यास आहे. तर ही परेड भारताची सांस्कृतिक विविधतेचे प्रतिनिधित्व करते आणि यात वेगवेगळ्या समुदायांचे देखावे देखील सामिल होतील, असे रविवारच्या कार्यक्रमाचे संचलन करणा-या फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने म्हटले आहे. अॅडम्स यांनी 'तिररस्कारला कोणतेही स्थान नाही' असे सप्ताहाच्या सुरुवातीच एका पत्रकारिषदेत म्हटले होते.
त्यांनी म्हटले होते की, "जर परेडमध्ये असा एखादा देखावा आणि कोणी व्यक्ती असेल जो तिरस्काराला खतपाणी घालत असेल तर त्यांनी तसं करु नये." अॅडम्स यांच्या कार्यालयाने एसोसिएटेड प्रेसला सांगितले की, अमेरिकन संविधानाच्या पहिल्या सुधारणेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार शहराला परमिट देण्यापासून रोखणे किंवा एखाद्या देखावा किंवा परेडच्या संदेशाला बदलण्याच्या आवश्यकतेला केवळ यापासून रोखतो, कारण ते या सामग्रीशी सहमत नाहीत.
मात्र हिंदूंचे म्हणणे आहे की, अयोध्या हे स्थळ त्यांच्यासाठी पवित्र होते, पण मुस्लिम मुघलांनी 1528 मध्ये बाबरी मशीद बांधण्यासाठी तेथील मंदिर पाडले, नंतर मशिद 1992 मध्ये नष्ट करण्यात आली. मशिदीच्या विध्वसांनंतर देशभरात दंगली झाल्या, ज्यात 2000 लोक मारले गेले, ज्यात मुसलमानांची संख्या जास्त होती, सर्वोच्च न्यायालयाने या वादग्रस्त जमिनीचा निर्णय हिंदूच्या बाजूने दिला.
मानवाधिकार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिंदू राष्ट्रवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात अल्पसंख्यांकांवर हिंसा, भेदभाव आणि हल्ल्यांत वाढ झाली आहे, परंतू मोदी हे सर्व आरोप फेटाळतात. न्यूयाॅर्क शहरात वार्षिक परेड ही भारतीय स्वातंत्र्यदिनानंतर तीन दिवसांनी आयोजित केली जाते.












Click it and Unblock the Notifications