Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

डोनाल्ड ट्रम्पंबाबत 3 भविष्यवाण्या! 2 ठरल्या खऱ्या; आता तिसरं धडकी भरवणारं भाकित, VIDEO व्हायरल

China's Nostradamus 2 Predictions About Trump : जगभरात सध्या युद्धाचे ढग दाटलेले असताना एका चिनी प्रोफेसरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. येल युनिव्हर्सिटीचे पदवीधर आणि इतिहासकार जियांग शुएक्सिन (Jiang Xuexin) यांनी २०२४ मध्ये केलेल्या तीन भविष्यवाण्यांपैकी दोन पूर्णपणे खऱ्या ठरल्या आहेत. आता त्यांच्या तिसऱ्या आणि सर्वात भीतीदायक भविष्यवाणीमुळे अमेरिकेसह संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.

China s Nostradamus 2 Predictions

काय होत्या त्या ३ भविष्यवाण्या?

जियांग यांनी मे २०२४ मध्ये आपल्या एका लेक्चरमध्ये तीन महत्त्वाचे दावे केले होते.

  • १. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये परततील (हे खरे ठरले आहे).
  • २. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध होईल (सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहता हे देखील सत्याच्या जवळ आहे).
  • ३. हे युद्ध अमेरिकेसाठी विनाशकारी ठरेल आणि त्यांचा पराभव होईल (या तिसऱ्या भविष्यवाणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे).

अमेरिकेसाठी 'एथेन्स'सारखी आपत्ती?

जियांग यांनी अमेरिकेच्या इराणवरील संभाव्य हल्ल्याची तुलना प्राचीन ग्रीसमधील एथेन्सच्या एका अयशस्वी लष्करी मोहिमेशी केली आहे. त्यांच्या मते, हे युद्ध लवकर संपणारे नसेल. इराणने गेल्या दोन दशकांपासून या युद्धाची तयारी केली असून, थेट संघर्षाऐवजी अमेरिकेला हळूहळू कमकुवत करण्याची त्यांची रणनीती आहे.

कोण आहेत प्रोफेसर जियांग?

जियांग शुएक्सिन हे बीजिंगमध्ये तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ते आपल्या 'Predictive History' या यूट्यूब चॅनेलद्वारे जागतिक राजकारणाचे विश्लेषण करतात. ऐतिहासिक घटनांचा कल ओळखून भविष्यातील सत्तासंघर्षाचा अंदाज वर्तवण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. सध्याच्या इराण-अमेरिका संघर्षात इराणला काही सामरिक फायदे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

(डिस्क्लेमर: ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि प्रोफेसर जियांग यांच्या वैयक्तिक विश्लेषणावर आधारित आहे. यात वर्तवलेले अंदाज हे पूर्णपणे त्यांचे वैयक्तिक मत असून त्याचा वास्तवातील युद्धाच्या निकालाशी संबंध असेलच असे नाही.)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+