पोपची निवड कशी होते, कोण करते निवड? चिमणी आणि काळा-पांढऱ्या धुराचा संबंध काय, जाणून घ्या प्रक्रिया
Chimney and black-white smoke How is the Pope selected : कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे आज 21 एप्रिल 2025 रोजी निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी पोप यांनी अखेरचा श्वास घेतला. पोप यांचे आज स्थानिक वेळेनुसार सकाळी दीर्घ आजाराने 7:35 वाजता निधन झाले.
पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. त्यांच्या मृत्यूनंतर जगभरात दुःख व्यक्त होत आहे. आता त्यांच्यानंतर नवीन पोप कोण होणार? यासाठी निवड करावी लागणार आहे, ही निवड कशी होते, चिमनी आणि काळा-पांढऱ्या रंगाच्या धुराचे कनेक्शन काय आहे हे आपण जाणून घेऊया.

नवीन पोपची निवड कोण करते?
पोप होण्यासाठी, उमेदवार पुरुष आणि कॅथोलिक ख्रिश्चन असणे आवश्यक आहे. पोप 120 कार्डिनल्सद्वारे निवडले जातात. पोपच्या मृत्यूच्या वेळी किंवा राजीनामा देताना त्या सर्वांचे वय 80 वर्षांपेक्षा कमी असावे. 22 जानेवारी 2025 पर्यंत, जगभरात 252 कार्डिनल आहेत. यापैकी 138 कार्डिनल असे आहेत ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा कमी आहे. नवीन पोप निवडण्याच्या प्रक्रियेला 'पपल कॉन्क्लेव्ह' म्हणतात. जेव्हा पोपचा मृत्यू होतो किंवा ते राजीनामा देतात, तेव्हा कॅथोलिक चर्चचे कार्डिनल नवीन पोपची निवड करतात.
पोपची निवड कशी होते?
कार्डिनल्स हा मुख्य पुजारींचा समूह असतो. त्यांचे काम पोपला सल्ला देणे हे असते. प्रत्येक वेळी या कार्डिनल्समधून पोप निवडला जातो. पोप होण्यासाठी कार्डिनल असणे आवश्यक नसले तरी आजपर्यंतचा प्रत्येक पोप निवडून येण्यापूर्वी कार्डिनल होता हे विशेष..
- कॉन्क्लेव्हच्या पहिल्या दिवसाची सुरुवात विशेष प्रार्थना सभेने होते.
- प्रार्थनेदरम्यान सर्व कार्डिनल्स एका खोलीत एकत्र होतात.
- प्रत्येक कार्डिनल गॉस्पेलवर म्हणजेच पवित्र ग्रंथावर हात ठेवून या निवडणुकीशी संबंधित कोणतीही माहिती इतर कोणालाही उघड करणार नाही अशी शपथ घेतात.
- संबंधित खोली बंद केली जाते आणि त्यानंतर गुप्तपणे मतदान प्रक्रिया सुरू होते.
- प्रत्येक कार्डिनल कागदाच्या तुकड्यावर त्याना ज्याची निवड करायची त्यांचे नाव लिहितात.
- यानंतर ते एका प्लेटमध्ये ठेवले जातात. यानंतर तीन अधिकारी त्यांची मोजणी करतात. मतदानानंतर सर्व मतपत्रिका जाळल्या जातात.
मग..पांढऱ्या-काळ्या धुराचा काय संबंध?
- मतदान संपल्यावर निकाल दर्शविण्यासाठी पांढरा किंवा काळा धूर दिला जातो.
- नवीन पोपबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही हे दर्शविण्यासाठी चिमणीतून
- काळा धुर सोडला जातो.
- नवीन पोपची निवड झाल्यावर हे दर्शविण्यासाठी चिमणीतून पांढरा धूर सोडला जातो.
पोप बनण्यासाठी किती मतं आवश्यक असतात?
1159 च्या निवडणुकीत एकाच वेळी दोन पोप निवडले गेले. बहुसंख्य कार्डिनल्सनी पोप अलेक्झांडर तिसरा म्हणून कार्डिनल रोलांडो यांची निवड केली. त्याच वेळी, कार्डिनल्सच्या एका लहान गटाने मॉन्टिसेलीला पोप व्हिक्टर -4 म्हणून निवडले.
लहान गटाच्या पोपला राजा फ्रेडरिक बार्बोसाचा पाठिंबा होता. अशा परिस्थितीत पोप अलेक्झांडर-3 यांना त्यांचा बहुतांश वेळ रोमच्या बाहेर घालवावा लागला. दरम्यान, कमी पाठिंबा असलेले पोप रोममध्ये राहिले. हा वाद 1164 मध्ये पोप व्हिक्टर IV च्या मृत्यूनंतरच संपला. तेव्हापासून पोप निवडण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आले. सर्व कार्डिनल्समध्ये अधिक सहमती सुनिश्चित करण्यासाठी, पोपच्या निवडणुकीसाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते.
मतदानाच्या तीन दिवसांनंतर पोपची निवड न झाल्यास, मतदान एका दिवसासाठी थांबते. 33 फेऱ्यांनंतरही कोणी निवडले नाही, तर नवीन नियमांनुसार टॉप-2 स्पर्धकांमध्ये स्पर्धा होते.












Click it and Unblock the Notifications