ChatGPT डाउन, चॅटबॉटमध्ये प्रवेशच करता येईना; वाचा नेमकं काय झालं?
लोकप्रिय AI चॅटबॉट ChatGPT हे वापरताना सध्या व्यत्यय आला आहे. ज्यामुळे लाखो वापरकर्ते या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकत नाहीत. या सेवेशी कनेक्ट करताना वापरकर्त्यांना एरर मेसेजेस येत आहेत. ज्यांचे कनेक्ट होत आहे तेही अगदी स्लो लोडिंगची समस्या अनुभवत आहेत. या वापरकर्त्यांकडून सध्या अनेक तक्रारी सुरु झाल्या आहेत.

नेमकं काय झालंय?
लोकप्रिय AI चॅटबॉट ChatGPT हे आउटेज जगभरातील वापरकर्त्यांवर परिणाम करत असल्याचे दिसत आहे. विविध क्षेत्रांमधून याबाबत तक्रारी आल्या आहेत. या व्यत्ययाचे कारण सध्यातरी अज्ञात आहे. सर्व्हर ओव्हरलोड, तांत्रिक समस्या किंवा नियोजित देखभालीत कमतरता या कारणांवर सध्या काम सुरु आहे. ChatGPT च्या मागे असलेल्या OpenAI कंपनीने अद्याप आउटेजबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.
कुणाच्या आहेत तक्रारी?
या व्यत्ययामुळे विद्यार्थी, संशोधक, व्यावसायिक आणि सर्जनशील लेखन, सामग्री निर्मिती आणि इतर कार्यांसाठी ChatGPT चा वापर करणाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे वापरकर्ते त्यांची निराशा व्यक्त करण्यासाठी सोशल मिडिया साईड ट्विटरचा वापर करत आहेत. एका यूजरने ट्विट केले की, "चॅटजीपीटी बंद आहे. आता काय करावं सुचत नाहीये..." दुसऱ्या वापरकर्ता म्हणतो, "चॅटजीपीटी बंद आहे आणि मला असे वाटू लागले आहे की रोबोट सत्तापालट करत आहे." तिसऱ्या वापरकर्त्याने गमतीने ट्विट केले आहे की, "Chatgpt बंद आहे. त्यामुळे एक्सवर गर्दी झाली आहे"
काय असावीत कारणे?
ChatGPT व्यत्यय येण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यात सर्व्हर ओव्हरलोड्स हेही एक कारण असू शकते. वापरकर्त्याची मागणी वाढल्याने ChatGPT च्या सर्व्हरवर जास्त ताण येऊ शकतो व त्यामुळे सर्व्हर डाऊन किंवा स्लो या समस्या होऊ शकतात, असा अंदाज बांधला जातोय. याशिवाय तांत्रिक समस्याही असू शकते. सॉफ्टवेअर बग, हार्डवेअर बिघाड किंवा मूलभूत पायाभूत सुविधांतील समस्या सामान्य ऑपरेशन्समध्ये व्यत्यय आणू शकतात, असेही काहींचे म्हणणे आहे. या व्यत्ययातील तिसरी समस्या देखभालही असू शकते. OpenAI च्या सिस्टीमवर नियोजित किंवा अनियोजित देखभाल या कारणाने व्यत्यय आला असण्याची शक्यता आहे.
व्यत्यय कधी दूर होईल?
या व्यत्ययाचे कारण अद्याप समोर न आल्याने ते कधीपर्यंत सुरु होईल, हे अद्याप कंपनीकडून सांगितले गेलेले नाही. त्यामुळे या वापरकर्त्यांना सुरळीत सेवा कधी मिळेल, याबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!









Click it and Unblock the Notifications