Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Canada Election Result: मार्क कार्नी कोण आहेत?, कॅनडाचे लिबरल पक्षाचे नेते जे पुन्हा PM बनण्यास सज्ज

Canada Election Results 2025 : पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पक्षाने सोमवारी कॅनडाची निवडणूक जिंकली. सीबीसी आणि सीटीव्ही न्यूज यांनी दिलेल्या वृत्तानुसार, लिबरल पक्ष कॅनडाचे पुढचे सरकार स्थापन करणार आहे, असा दावा केला आहे. परंतु संसदेत त्यांना बहुमत किती व कसे मिळेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेले नाही.

पंतप्रधान मार्क कार्नी यांचा आर्थिक संकटांचे व्यवस्थापन करण्याचा अनुभव त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम आहे, असेही त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोकांना पटवून सांगितले. त्यामुळेच की काय लिबरल पक्षाला सलग चौथ्यांदा विजय मिळवता आला आहे, जो कॅनडाच्या राजकारणातील दुर्मिळ प्रसंग मानला जात आहे.

प्रचाराचा काय राहिला प्रमुख मुद्दा?

कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहिला तो अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे व्यापार युद्ध आणि कॅनडाला जोडण्याच्या धमक्या. त्यामुळे कॅनेडियन लोक संतप्त झाले आणि अमेरिकेशी व्यवहार करणे हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला. 60 वर्षीय कार्नी, ज्यांनी कधीही निवडून आलेले पद भूषवले नव्हते आणि गेल्या महिन्यातच जस्टिन ट्रूडो यांच्या जागी पंतप्रधान झाले होते, त्यांनी ट्रम्पविरोधी प्रचाराला वेग दिला त्यामुळे त्यांच्या लिबरल पक्षाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत.

Who Is Mark Carney

(फोटो क्रेडिट : Mark Carney Facebook)

लिबरलचे नेते-पीएम कोण आहेत मार्क कार्नी?

मार्क कार्नी यांनी आर्थिक विषयात मोठे काम केलेले आहे. अर्थव्यवस्थेच्या दुनियेत त्यांचे काम मैलाचा दगड मानले जाते. अर्थतज्ज्ञ ही त्यांची प्रतिष्ठा त्यांना लिबरल पक्षाचे नेते होण्यास मदत करणारी ठरली. जस्टीन ट्रुडो यांच्यानंतर त्यांनी कॅनडाचे पीएम पद स्वीकारले. तर त्यानंतर आता पुन्हा निवडणुका झाल्या असून यात पुन्हा मार्क कार्नी हेच पीएम पदावर विराजमान राहणार, असे निकालातून दिसून येत आहे.

मार्क कार्नी यांचा जन्म व शिक्षण कुठे झाले?

मार्क कार्नी हे 60 वर्षांचे असून त्यांचा जन्म 1965 मध्ये कॅनडातील नॉर्थवेस्ट टेरिटोरीजमधील फोर्ट स्मिथ येथे झाला. एडमॉन्टनमध्ये वाढलेले कार्नी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी युनायटेड किंग्डममधून पदव्युत्तर पदवी आणि त्यानंतर 1995 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. कार्नी शालेय जीवनात आईस हॉकीही खेळत असे.

कॅनडा बॅंकेचे गव्हर्नरपदावर काम केले?

बँक गव्हर्नर म्हणून जगातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये मार्क कार्नी यांनी दीर्घकाळ काम केले आहे. 2008 मध्ये कार्नी यांची बँक ऑफ कॅनडाच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली. या पदावर असताना त्यांना जगभर ओळख मिळाली. 2008 च्या आर्थिक संकटातून कॅनडाला उभारण्यास कार्नी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

2010 मध्ये प्रकाशीत झालेल्या टाईम मासिकाने त्यांना जगातील 25 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले होते. पुढच्याच वर्षी म्हणजे 2011 मध्ये रीडर्स डायजेस्ट कॅनडाने त्यांना 'मोस्ट ट्रस्टेड कॅनेडियन' आणि 2012 मध्ये युरोमनी मासिकाने सेंट्रल बँक गव्हर्नर ऑफ द इयर म्हणून घोषित केले.

लिबरल पक्षात काम करण्याचा निर्धार, सर्व पदांचा दिला राजीनामा

2013 मध्ये कार्नी बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी ब्रिटनमध्ये आले होते. 300 वर्षांच्या इतिहासात या संस्थेचे प्रमुख पद भूषविणारे ते पहिले बिगर ब्रिटीश नागरिक होते. 2020 पर्यंत ते या पदावर होते. 2020 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान कृती आणि वित्त विषयक विशेष दूत म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कार्नी यांनी गोल्डमन सॅक्समध्येही काम केले आहे. कॅनडाच्या लिबरल पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी इतर सर्व पदांचा राजीनामा दिला.

मार्क कार्नी यांच्या कुटुंबात कोण कोण असते?

1994 मध्ये विवाहित असलेले मार्क कार्नी यांना चार मुले आहेत. त्यांनी 1994 मध्ये ब्रिटनच्या डायना फॉक्ससोबत लग्न केले होते. फॉक्स आणि कार्नी या विकसनशील देशांतील तज्ज्ञ ब्रिटिश अर्थतज्ज्ञाची ऑक्सफर्ड विद्यापीठात भेट झाली. फॉक्सकडे ब्रिटन आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे. गेल्या काही वर्षांपासून ती आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिकेत काम करत आहे. या दाम्पत्याला 4 मुले आहेत. जे उच्चशिक्षण घेत आहेत.

कार्नी यांच्यासमोर प्रमुख आव्हाने काय आहेत?

मार्क कार्नी यांच्यासमोर पहिले मोठे आव्हान असेल ते अमेरिका-कॅनडा संबंधांमधील ताणलेले संबंध सोडवणे, जे आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी, कार्नी त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची योजना आखत आहेत, ज्यामध्ये अर्थमंत्री डोमिनिक लेब्लँक आंतरराष्ट्रीय व्यापार खात्याकडे वळतील आणि नवोन्मेष मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील. युरोपमध्ये, विशेषतः लंडन आणि पॅरिसमध्ये, जिथे कार्नी पुढील आठवड्यात भेट देणार आहेत, कॅनडाच्या युती मजबूत करण्याच्या उद्देशाने हे धोरणात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+