समुद्रात चार बोटी बुडाल्या; 180 प्रवासी बेपत्ता, वाचा नेमकं काय घडलंय?
यमन आणि जिबूतीदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चार बोटी बुडाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत सुमारे 180 लोक बेपत्ता झाल्याची मिळाली आहे. संयुक्त राष्ट संघाकडूनही या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. ही दुर्घटना त्या मार्गावर घडली, जो मार्ग सर्वात धोकादायक समजला जातो. या मार्गाने इथोपियन नागरिक रोजगाराच्या शोधात आखाती देशांमध्ये जातात. त्याच मार्गावर हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

कधी घडली दुर्घटना?
ही दुर्घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये चार बोटी समुद्रात बुडाल्या. या चारही बोटींवर सुमारे 180 लोक प्रवास करत असल्याचे सांगितले जाते. ते सर्व प्रवासी बेपत्ता झाले आहेत. दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरु करण्याच आले. मात्र भारतीय वेळेनुसार सायंकाळपर्यंत कोणतीच अपडेट समोर आली नव्हती. या बोटीतील जेवढे प्रवासी बुडालेत त्यापैकी कुणीच अद्यापही हाती लागले नसल्याचे सांगितले जाते.
यापूर्वीही घडलेत अपघात
हा अपघात यमन आणि जिबूतीदरम्यान असलेल्या समुद्री मार्गावर घडला. याच मार्गावर यापूर्वीही असेच अपघात घडले आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील या मार्गावर मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत बोट बुडाल्यानं 20 इथोपियन नागरिकांचा मृत्यू झाला होता. 2024 साली या मार्गानं एकूण 60,000 लोकांनी प्रवास केला. त्यातील 558 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. यावर्षी ही सलग दुसरी घटना आहे. यापूर्वी २० नागरीक मृत्यू पावले होते तर यावेळी 180 नागरीक बेपत्ता झाले आहेत.
बचावकार्य अजूही सुरुच
हा अपघात गुरुवारी रात्री झाल्याचे सांगितले जाते. मात्र आत्ता 24 तास उलटूनही बेपत्ता झालेल्या प्रवाशांपैकी एकही प्रवाशी सापडलेला नाही. रोजगाराच्या शोधात हे लोक या खतरनाक रस्त्याने प्रवास करतात, अपघात झाल्यास अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications