Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

3 लग्न,5 मुले अन् अनेक गर्लफ्रेंड,रंगीबेरंगी डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानियाची 'प्रेमकथा' वाचा

अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दररोज कोणत्या-ना कोणत्या मुद्द्यावरुन ते नेहमीच जगभरात चर्चेत असतात. ते जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे जगभरात पडसाद उमटतात. ट्रम्प हे अनेकदा त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत राहतात.

ट्रम्प यांचे प्रेम जीवन नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे, जे त्यांच्या राजकीय करिअरसारखेच गाजले आहे. ट्रम्प यांनी तीनदा लग्न केले असून त्यांच्या आयुष्यात अनेक गर्लफ्रेंड्स होत्या, ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनावर प्रभाव टाकला. सध्या त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प हे अमेरिकेच्या पहिल्या महिल्या म्हणून ओळखल्या जातात, परंतु त्यांच्यापूर्वी इवाना ट्रम्प आणि मार्ला मॅपल्स यांच्यासारख्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

Donald trump and wife melania trump

ट्रम्प यांचे प्रेम आणि पहिले लग्न: इवाना ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रेम जीवन 1977 मध्ये सुरू झाले. जेव्हा त्यांची भेट चेकोस्लोव्हाकियातील स्कीइंग मॉडेल इवाना झेल्निकोव्हा (आणि नंतर इवाना ट्रम्प) यांच्याशी झाली. हे दोघे एका पार्टीत भेटले. त्यानंतर दोघांनी डेटिंग सुरू केले आणि 7 एप्रिल 1977 रोजी न्यूयॉर्कमध्ये लग्न केले. हे ट्रम्प यांचे पहिले लग्न होते आणि या जोडप्याला तीन मुले आहेत. डोनाल्ड ज्युनियर (1977), इव्हान्का (1981) आणि एरिक (1984). इवाना ट्रम्प हिने ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्येही काम केले आणि ती एक यशस्वी व्यवासायिक होती. तिची स्टाइल आणि बुद्धिमत्तेमुळे ती ट्रम्प यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आधार होती.

परंतु, या लग्नात 1990 च्या दशकात तणाव निर्माण झाला. ट्रम्प यांचे मार्ला मॅपल्स यांच्यासोबतचे नाते समोर आल्याने इवाना आणि ट्रम्प यांच्यातील संबंध बिघडले. अखेर 1992 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही इवाना आणि ट्रम्प यांचे व्यवासायिक आणि कुटुंबीय संबंध कायम राहिले.

दुसरे लग्न मार्ला मॅपल्ससोबत

इवाना यांच्याशी घटस्फोटानंतर ट्रम्प यांनी 1993 मध्ये अभिनेत्री आणि मॉडेल मार्ला मॅपल्स यांच्यासोबत लग्न केले. मार्ला यांच्याशी त्यांचा परिचय 1980 च्या दशकात झाला होता. मार्ला मॅपल्स ही एक अभिनेत्री म्हणून उदयास येत होती. ट्रम्प आणि मार्ला यांचे नाते इवाना यांच्याशी असताना सुरू झाले होते, ज्यामुळे मोठी चर्चा रंगली होती. या जोडप्याला एक मुलगी, टिफनी ट्रम्प (1993) झाली. मार्ला मॅपल्स हिने ट्रम्प यांच्या वैयक्तिक आयुष्यात थोड्या काळासाठी स्थिरता आणली, परंतु त्यांचे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही.

1997 मध्ये, अवघ्या चार वर्षांच्या लग्नानंतर ट्रम्प आणि मार्ला यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाचे कारण ट्रम्प यांचे इतर महिलांशी संबंध आणि वैवाहिक निष्ठेचा अभाव हे मानले जाते. मार्ला यांनी नंतर आपले आयुष्य वेगळ्या दिशेने घेतले आणि त्या एका प्रेरणादायी वक्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. या लग्नाने ट्रम्प यांच्या प्रेम जीवनात आणखी एक गुंतागुंत निर्माण केली, ज्यामुळे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेवर परिणाम झाला. तरीही टिफनी ट्रम्प हे या संबंधाचे सकारात्मक परिणाम म्हणून पाहिले जाते, जी आज एक यशस्वी व्यक्ती बनली आहे.

मेलानिया ह्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिस-या पत्नी

ट्रम्प यांचे तिसरे आणि सध्याचे लग्न मॉडेल मेलानिया न्य्स (मेलानिया ट्रम्प) यांच्यासोबत झाले, जे त्यांच्या प्रेम जीवनातील सर्वात स्थिर आणि चर्चित अध्याय आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांची 1998 साली न्यूयॉर्क येथील एका फॅशन पार्टीमध्ये भेट झाली. त्यानंतर त्यांची प्रेम कहानी सुरू झाली आणि दोघांनी 22 जानेवारी 2005 रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाला बिल आणि हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक मान्यवर आले होते. त्या दोघांना 2006 मध्ये मुलगा झाला आणि त्याचे नाव बॅरन ट्रम्प ठेवले. मुलगा चार महिन्याचा असताना डोनाल्ड ट्रम्प यांचे खरे रूप मेलानियाला कळले. जुलै 2006 मध्ये ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅलीयल्सी संबंध ठेवल्याचा आरोप केला. त्यानंतर प्लेबॉय मॉडर्न तिच्याशी देखील त्यांचे अफेअर असल्याची चर्चा सुरू होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन लग्न केले, एकूण पाच मुले झाली,दोन घटस्फोट घेतले अशी त्यांची प्रेम कहाणी आहे.

तिसऱ्या लग्नानंतर ट्रम्पचे नशीब बदलले!

मेलानियाशी लग्न झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या नशिबाने एक नवीन वळण घेतले. 2015 मध्ये त्यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आणि 2017 मध्ये ते अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष बनले. आता 2025 मध्ये ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

ट्रम्प यांनी अनेकदा सांगितले आहे की, मेलानियाचा त्यांच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव पडला आहे. ट्रम्प यांनी 2016 मध्ये म्हटले होते की, मेलानिया एक अद्भुत पत्नी आणि एक अविश्वसनीय आई आहे. ती एक अद्भुत प्रथम महिला आहे." तिच्या उपस्थितीने ट्रम्पचे वैयक्तिक जीवन स्थिर केलेच नाही तर त्यांची राजकीय कारकीर्दही नवीन उंचीवर नेली. उद्या 26 एप्रिल रोजी ट्र्म्प यांच्या तिस-या पत्नी मेलानिया यांचा वाढदिवस आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+