ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज फोटोसाठी पोझ देताना स्टेजवरून खाली कोसळले! पाहा व्हिडिओ
Australian PM Anthony Albanese : सेल्फी देताना किंवा पोज देतो तेव्हा कधी कधी मोठी दुर्घटना होते, किंवा तोलही ढळतो.. असाच तोल चक्क ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा ढळला. एवढेच नाही तर ते चक्क स्टेजवरुन खाली कोसळले, पण वेळीच त्यांची इतर सहकाऱ्यांनी मदत केली...आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुठे घडली घटना..
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे न्यू साउथ वेल्समधील एका कार्यक्रमात सहभागी होते, दरम्यान अँथनी अल्बानीज हे फोटोसाठी पोज देण्यासाठी स्टेजवरून घसरले. मे च्या राष्ट्रीय निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमात पंतप्रधान भाषणानंतर फोटो देत असताना ही घटना घडली.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या रेडिओ मुलाखतीदरम्यान त्यांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा अल्बानीज यांनी या घटनेवर भाष्य केले. त्यादरम्यान, त्यांनी याविषयी भाष्य केले. "मी एक पाऊल मागे आलो. मी स्टेजवरून पडलो नाही... फक्त एक पाय खाली गेला असे ते म्हणाले. यासंदर्भात रायटर्सने वृत्त दिले आहे.
BREAKING: Prime Minister Anthony Albanese just fell off the stage during a campaign event.
No reported injuries. pic.twitter.com/FoZZqDBDhy
— Australians vs. The Agenda (@ausvstheagenda) April 3, 2025
BREAKING: Prime Minister Anthony Albanese just fell off the stage during a campaign event.
No reported injuries. pic.twitter.com/FoZZqDBDhy
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
अँथनी अल्बानीज हे मंचावरुन पडल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. पोज देण्यासाठी ज्यावेळी अल्बानीज जात होते तेव्हा ते स्टेजवरून खाली पडताना दिसत आहे. काही क्षण स्टेजवर धावपळ होते आणि अल्बानीजने हसत सावरतात आणि जमावाला दोन हात उंचावून आपण ठीक असल्याचे स्पष्ट करतात हे या व्हिडिओत दिसत आहे.
Anthony Albanese has fallen off the stage while speaking at a mining union conference… pic.twitter.com/Z716MlW629
— Roman Mackinnon (@RomanMackinnon6) April 3, 2025












Click it and Unblock the Notifications