स्वित्झर्लंडमध्ये आजपासून बुरखा घालण्यावर बंदी; कायदा मोडल्यास बसेल एवढा दंड, वाचा काय आहे तरतूद
Burqa wearer arrested in Switzerland : आजपासून स्वित्झर्लंडमध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणत्याही साधनाने चेहरा झाकण्यावर बंदी लागू केली आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, या कायद्याचे उल्लंघन केल्यास 1000 स्विस फ्रँक्स म्हणजेच अंदाजे 96 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.
2021 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या सार्वमतामध्ये 51.21% नागरिकांनी बुरख्यावर बंदी घालण्याच्या बाजूने मतदान केले. यानंतर बुरख्यावरील बंदीबाबत कायदा करण्यात आला, जो आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे.

स्वित्झर्लंडपूर्वी बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बल्गेरियामध्येही याबाबत कायदे करण्यात आले आहेत. या कायद्यानंतर सार्वजनिक कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी महिलांना चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही.
2022 मध्ये आला कायदा
2022 मध्ये राष्ट्रीय परिषदेने, स्विस संसदेचे कनिष्ठ सभागृह, चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याच्या कायद्यावर मतदान केले. या कालावधीत 151 सदस्यांनी बाजूने तर 29 सदस्यांनी विरोधात मतदान केले. त्यानंतर याबाबत कायदा करण्यात आला.
हा प्रस्ताव उजव्या विचारसरणीच्या स्विस पीपल्स पार्टीने (एसव्हीपी) मांडला होता, तर केंद्र आणि ग्रीन्स पक्ष याच्या विरोधात होते. काही लोकांचे म्हणणे आहे की हा कायदा मुस्लिम महिलांना अन्यायकारकपणे लक्ष्य करतो. या कायद्याचे समर्थन करणारे दावा करतात की, सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक मूल्य आणि सुरक्षिततेसाठी हे एक आवश्यक पाऊल आहे.












Click it and Unblock the Notifications