Big News : ISIS वर अमेरिकचा एअरस्ट्राईक! सोमालियात अनेक दहशतवादी ठार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

American air strike on isis : अमेरिकेचा राज्यकारभार हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इसीस दहशतवाद्यांना चांगलेच पाणी पाजले. अमेरिकेने एअरस्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यासंदर्भात शनिवारी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खुद्द माहिती दिली आणि अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावाही केला आहे.

सोमालियाचा वरिष्ठ हल्ला नियोजक आणि त्याने भरती केलेल्या दहशतवाद्यांवर लष्करी हवाई हल्ले करण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ते आम्हाला आणि आमच्या सहयोगींसाठी धोका होते."

American air strike on isis

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

ट्रम्प पुढे म्हणाले की, या हवाई हल्ल्यात दहशतवादी लपून बसलेल्या गुहा उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, यामध्ये कोणत्याही नागरिकाला इजा झालेली नाही. अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. ट्रम्प यांनी म्हटलं की, "आम्ही तुम्हाला शोधून ठार करू. हा संदेश ISIS आणि अमेरिकनांवर हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना आहे." ट्रम्प सत्तेत परतल्यानंतर अमेरिकेच्या लष्कराने केलेली ही पहिली लष्करी कारवाई होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+