पाकिस्तानला मदत करतोय काय? भारताने चीनला दिला पहिला दणका; वाचा अमेरिकेत काय झाले
जम्मू- काश्मिरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील संबंध चांगलेच ताणले. भारत कधीही पाकिस्तानवर हल्ला करु शकतो, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यातच पाकिस्तानला मदत करण्यासाठी पहिल्यांदा चीन व नंतर तुर्कस्थान धावले. त्यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पाठवली. हे करत असताना चीनने भारताची नाराजी अंगावर घेतली. आता याच चीनला भारताने पहिला दणका दिला आहे.

नेमकं काय झालं?
अमेरिकेच्या व्यापार युद्धात चीनवर मोठा कर लादण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेच्या व्यापारात चीन फसल्याचे दिसत आहे. त्यातच अमेरिकेने त्यांचा पहिला व्यापारी करार भारतासोबत होऊ शकतो असे संकेत दिले आहे. जर असे झाले तर तो चीनसाठी मोठा धक्का समजला जात आहे. अमेरिकेचे आर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अमेरिकेच्या टॅरीफला टाळण्यासाठी अनेक देशांनी खूप चांगले प्रस्ताव दिले. मात्र आमचा सर्वात आधी करार हा भारतासोबत होऊ शकतो. स्कॉट बेसेंटचं हे वक्तव्य चीनच्या टेन्शनमध्ये वाढ करणारं आहे.
चीनला बसला धक्का
स्काॅट बेसेंट यांच्या या वक्तव्याचा फटका चीनला चांगलाच जिव्हारी लागणार आहे. कारण अमेरिकेकडून चीनवर प्रचंड टेरीफ लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनं भारतासोबत करार केल्यास चीनच्या भारतातील बाजारपेठेला मोठा फटका बसू शकतो. चीनचा खूप मोठा व्यापार हा अमेरिकेवर अबलंबू आहे. मात्र आता अमेरिका जर भारतासोबत पहिला करार करणार असेल तर चीनच्या बाजारपेठेवर त्याचा नक्कीच प्रभाव पडणार आहे.
स्कॉट नेमकं काय म्हणाले?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्काॅट म्हणाले की, आमच्या या निर्णयानंतर चीनने अमेरिकेच्या उत्पन्नावरील टॅरीफ कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. मला असं वाटतं की चीन हा निर्णय घेऊन स्वत:ला वाचवत आहेत. एक दिवस ते नक्कीच स्वत:हून आमच्याकडे येतील, असं स्कॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आशियातील इतर अनेक देशांसोबत आमची चर्चा सुरू आहे. मात्र माझा असा अंदाज आहे, आमचा पहिला व्यापारी करार हा भारतासोबत होऊ शकतो. याच आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती वेंस हे गेल्या आठवड्यात भारत दौऱ्यावर होते. दोन्ही बाजुंनी सकारात्मक बोलणं झालं असं स्कॉट यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications