डोनाल्ड ट्रम्प यांचे नेमके चाललेय काय? तब्बल ४३ देशांच्या नागरिकांना यूएसमध्ये नो एन्ट्री
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यापासून ते दररोज नवीन आदेश जाहीर करत आहेत. आता त्यांनी तब्बल ४० पेक्षा जास्त देशांना प्रवास बंदीचा निर्णय जाहीर केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासन नवीन बंदी अंतर्गत डझनभर देशांच्या नागरिकांसाठी व्यापक प्रवास बंदी जारी करण्याचा विचार करत आहे. ट्रम्प प्रशासनाने ४३ देशांना तीन श्रेणींमध्ये ठेवले आहे. या यादीत अफगानिस्तान, पाकिस्तान आणि रशिया यांच्यासारख्या देशांचा समावेश आहे. भारताचे नाव या यादीत नसल्याचे सांगितले जात आहे.

रेड लिस्टमध्ये कोणते देश
डोनाल्ड ट्रम्प यांनी रेड लिस्टमध्ये तब्बल ११ देश ठेवले आहेत. त्यात अफगाणिस्तान, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया सारखे देश आहेत. ज्यांचे व्हिसा पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. याशिवा लिबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सूडान यांचाही याच यादीत समावेश आहे.
ऑरेंज लिस्टमध्ये कोणते देश
दुसऱ्या गटात इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार आणि दक्षिण सुदानसह पाच देशांना अंशतः निलंबनाचा सामना करावा लागेल, ज्यामुळे पर्यटक आणि विद्यार्थी व्हिसा तसेच काही अपवादांसह इतर स्थलांतरित व्हिसा प्रभावित होतील.
तिसऱ्या गटात तब्बल २६ देश
तिसऱ्या गटात , पाकिस्तान, भूतान आणि म्यानमारसह एकूण २६ देशांचा समावेश आहे. या देशांच्या सरकारने ६० दिवसांच्या आत त्यांचा व्हिसामधील कमतरता दूर करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर त्यांना अमेरिकन व्हिसा जारी करण्याचे अंशतः निलंबन दिले जाईल. हे बहुतेक देश अफ्रिका व कॅरिबियन आहेत. या यादीत अंगोला, अँटिग्वा आणि बारबुडा, बेनिन, बुर्किना फासो, कंबोडिया, कॅमेरून, केप वर्दे, चाड, काँगो प्रजासत्ताक, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, डोमिनिका, विषुववृत्तीय गिनी, गांबिया, लायबेरिया, मलावी, माली, मॉरिटानिया, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लुसिया, साओ टोम आणि प्रिन्सिपे, वानुआटु आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे काय?
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे की हे देश अमेरिकेसोबत प्रवाशांबद्दलची माहिती पुरेशी शेअर करण्यात अयशस्वी ठरतात किंवा पासपोर्ट जारी करताना त्यांच्याकडे सुरक्षा पद्धती ढिल्या असतात, ज्यामुळे बंदी घातलेल्या देशांमधील व्यक्तींना त्रुटींचा फायदा घेता येऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications