अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, गुजरातच्या बाप-लेकीचा मृत्यू; हत्येमागील धक्कादायक कारणं आलंय समोर!
US Crime News : अमेरिकेतील व्हर्जिनिया या ठिकाणी एका स्टोअरमध्ये गोळीबाराची अचानक घटना घडली. यात भारतीय वंशाच्या बाप अन् लेकीची हत्या झाली आहे. या प्रकरणात अमेरिकन पोलिसांनी एका हल्लेखोरास अटक केली आहे. मृत झालेल्यांमध्ये गुजरातमधील प्रदीप कुमार पटेल आणि त्यांच्या मुलीचा समावेश आहे.
नेमकं काय घडलं, कसा घडला थरार?
मिळालेल्या माहितीनुसार, 20 मार्चला व्हर्जिनियामध्ये एका स्टोअरमध्ये गोळीबार झाला. या घटनेत प्रदीप कुमार पटेल आणि त्यांची मुलगी यांची हल्लेखोराने हत्या केली. ही घटना लँकफोर्ड हायवेला असलेल्या स्टोअरमध्ये घडली आहे.
एका संशयितास पोलिसांनी केले अटक
या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. जॉर्ज फ्राझइर असं या 44 वर्षीय संशयित हल्लेखोराचे नाव आहे. त्याला अॅकोमॅक येथील तुरुंगात धाडण्यात आलं आहे. अॅकोमॅकचे शेरीफांनी ही माहिती दिली.

अमेरिकन वेळेप्रमाणे 20 मार्च रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली. या ठिकाणी वडील आणि मुलीचा मृत्यू झाला दरम्यान एका महिलेलाही गोळी लागली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रदीप कुमार हे मुळ कुठले?
प्रदीप कुमार पटेल हे मूळचे मेहसाणा येथील कनोदा गावातले रहिवासी होते. गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या मुलीला गोळ्या लागल्याने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान तीचाही जीव गेला. अमेरिकेतील पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. हा बंदुकधारी हल्लेखोर दुकानात आला आणि त्याने थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली.
हल्लेखोराचा वाद आणि गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, 20 मार्चला सकाळी साडेपाचच्या दरम्यान आरोपी मद्य खरेदी करण्यासाठी स्टोअरमध्ये आला होता. त्यावेळी त्याचा स्टोअर मालकाशी वाद झाला. यावेळी त्याने पटेल आणि त्यांच्या मुलीवर गोळीबार केला. या घटनेनंतर पटेल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सहा वर्षांपासून राहत होते अमेरिकेत
प्रदीपभाई कुमार पटेल यांना तीन मुली आहेत. प्रदीप पटेल आणि त्यांची मुलगी उर्वी सहा वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य करत होते. प्रदीप पटेल आणि उर्वी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या मुली आणि जावई अमेरिकेत पोहचले आहेत. दुसरे म्हणजे गुजराती समाजाने देखील शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात न्यूज 18ने देखील वृत्त दिले आहे.












Click it and Unblock the Notifications