एअर इंडिया विमान अपघातात आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू; जगभरातील नेत्यांनी व्यक्त केल्या संवेदना!
Air India Plane Crash in Ahmedabad : गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. जगभरातील नेत्यांनी या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून ते पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफपर्यंत सर्वांनी या दुःखद घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 काही मिनिटांतच कोसळले. या अपघातात किमान 265 जणांचा मृत्यू झाला आहे. विमान टेकऑफनंतर लगेचच जवळच्या सरकारी रुग्णालयाच्या वसतिगृहावर कोसळले, ज्यामुळे मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला.

आतापर्यंत 265 मृतदेह रुग्णालयात पोहोचले
गुजरातचे पोलिस उपायुक्त कानन देसाई यांनी पीटीआयला सांगितले की, 265 मृतदेह रुग्णालयात पोहोचले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गुजरात शाखेचे प्रमुख डॉ. मेहुल शाह यांनी सांगितले की, या अपघातात 3 वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विमान अपघाताबद्दल जगभरातून शोक व्यक्त
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, "ही एक भयानक दुर्घटना होती. आमच्या संवेदना भारतासोबत आहेत. आम्ही शक्य तितक्या मदत करू." पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक्स वर पोस्ट केले आणि म्हटले की, "अहमदाबादजवळ एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताने मला दुःख झाले आहे. या मोठ्या नुकसानीमुळे पीडित कुटुंबांसोबत आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत."
ब्रिटीश पंतप्रधान काय म्हणाले?
ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनीही दुःख व्यक्त केले. पंतप्रधान केयर स्टारमर यांनी लिहिले की, "बाहेर येणारी दृश्ये खूप वेदनादायक आहेत." युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी लिहिले की, "हा दुःखाचा काळ आहे, युरोप भारतासोबत उभा आहे." नेपाळ, मलेशिया आणि मालदीव सारख्या देशांनीही त्यांच्या शोकसंवेदना पाठवल्या आहेत.
अपघाताची टाइमलाइन आणि उड्डाण तपशील
ही एअर इंडियाची फ्लाइट AI171 होती, जी बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान होती. हे विमान त्याच दिवशी दिल्लीहून अहमदाबादला पोहोचले आणि नंतर लंडनमधील गॅटविक विमानतळावर रवाना झाले.
टेकऑफची वेळ दुपारी 1:39 वाजता होती. उड्डाण करताच विमानाने 'मेडे' कॉल दिला आणि त्यानंतर संपर्क तुटला.
विमानात कोण कोण होते
विमानात एकूण २४२ लोक होते, यामध्ये २३० प्रवासी, १२ क्रू मेंबर्स.
त्यापैकी: १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक.
अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला
अपघातानंतर काही वेळातच, विमानाच्या टेकऑफचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये विमान हवेत संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि हळूहळू उंची गमावत, जमिनीवर आदळत आणि आगीच्या गोळ्यात रूपांतरित होत असल्याचे दिसून आले.
एअर इंडियाचे निवेदन आणि तपास
एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि म्हटले की 'हा एक अतिशय दुःखद क्षण आहे. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करणे ही आमची प्राथमिकता आहे. एअर इंडियाने प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १८०० ५६९१ ४४४ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. आता विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या अपघाताची चौकशी करेल.












Click it and Unblock the Notifications