ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच भारत-पाक नेत्यांची भेट! एस. जयशंकर-सादिक यांच्या भेटीत काय झाली चर्चा?

After Operation Sindoor Jaishankar Meets Pakistani Leader : बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि 'बीएनपी'च्या (BNP) सर्वेसर्वा खालिदा झिया यांच्या निधनानंतर दक्षिण आशियाई राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.

ढाका येथे पार पडलेल्या त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांची भेट झाली.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांमधील ही पहिलीच भेट असल्याने जागतिक स्तरावर याकडे लक्ष वेधले गेले आहे.

Operation Sindoor Jaishankar Meets Pakistani Leader

ढाका येथेच ही भेट का झाली?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी भारतासह जगभरातील अनेक देशांचे प्रतिनिधी ढाका येथे उपस्थित होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शोकपत्र घेऊन खालिदा झिया यांचे पुत्र आणि 'बीएनपी'चे अध्यक्ष तारिक रहमान यांची भेट घेतली. दुसरीकडे, पाकिस्तानकडून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे निकटवर्तीय सरदार अयाज सादिक उपस्थित होते. एकाच अंत्यविधी कार्यक्रमासाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने ही अनपेक्षित आणि अनधिकृत भेट ढाका येथे पार पडली.

कोण आहेत सरदार अयाज सादिक?

सरदार अयाज सादिक हे पाकिस्तानच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. ते सध्या पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे (लोकसभा) अध्यक्ष आहेत. अयाज सादिक हे नाव भारतात अधिक चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या संसदेत बालाकोट हल्ल्यानंतरचा एक प्रसंग सांगितला होता. भारतीय वैमानिक अभिनंदन यांना सोडले नाही तर भारत रात्री ९ वाजता हल्ला करेल, या भीतीने पाकिस्तानी नेत्यांचे पाय लटलट कापत होते, अशी कबुली सादिक यांनी दिली होती.

भेटीचे स्वरूप आणि महत्त्व!

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अयाज सादिक यांच्यात हस्तांदोलन झाले आणि काही काळ संवाद झाला. ही भेट अनधिकृत (Informal) होती. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध किंवा सीमावादावर यामध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी, भारत किंवा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत कोणतेही अधिकृत फोटो प्रसिद्ध केलेले नाहीत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+