झोमॅटोची ग्राहकांना भावनिक साद, केले हे आवाहन
Zomato News: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने ग्राहकांना दुपारी ऑर्डर न करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. देशातील अति उष्णतेपासून आणि उष्णतेच्या लाटेपासून आपल्या डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कंपनीने हे आवाहन केले आहे.
झोमॅटोने शनिवारी सांगितले की, जर फार महत्वाचे नसेल तर दुपारी जेवण ऑर्डर करू नका. सध्या देशात उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. उन्हामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून, अनेक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशाची राजधानी दिल्लीत तापमानाने ५० अंशांचा टप्पा ओलांडला होता.

डिलिव्हरी करणाऱ्यांना करावा लागतो उन्हाचा सामना
झोमॅटोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, कृपया दुपारी ऑर्डर करू नका. जेव्हा ऑर्डर दुपारी येते तेव्हा डिलिव्हरी पार्टनरला ऑर्डर देण्यासाठी तीव्र उन्हाचा सामना करावा लागतो. यंदा अनेक राज्यांमध्ये उष्णतेने विक्रम मोडले आहेत. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. बिहार, राजस्थान, यूपी, झारखंड आणि दिल्लीमध्ये उष्माघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, काही युझर्सने झोमॅटोला याबद्दल ट्रोलही केले आहे. या आवाहनाबद्दल युझर्सने काही प्रतिप्रश्न उपस्थित केले.
उष्णतेची लाट आणि मान्सूनच्या तयारीबाबत पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उष्णतेची गंभीर परिस्थिती आणि आगामी मान्सूनच्या तयारीबाबत आढावा बैठक घेतली होती. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. उष्णतेमुळे अनुचित घटना टाळण्यासाठी पुरेशी तयारी करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले.
दरम्यान उत्तर प्रदेशातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, गंगेचे पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ मध्येही तापमान अधिक असण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणामध्येही तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या जवळ आहे आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती उत्तर प्रदेशसारखीच आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील ५ दिवस आणि मध्यभागी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
pls avoid ordering during peak afternoon unless absolutely necessary 🙏
— zomato (@zomato) June 2, 2024
दीपिंदर गोयल यांनी सुरू केली होती हवामान माहिती देणारी सेवा
अलीकडेच झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल गोयल यांनी हवामानाची माहिती देणारी सेवा सुरू केली होती. याच्या मदतीने स्थानिक हवामानाची माहिती मिळत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. झोमॅटोसाठी त्यांनी ही सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले होते. दीपिंदर गोयल म्हणाले होते की, आमच्या डिलिव्हरी पार्टनरला प्रत्येक हंगामात काम करावे लागते. त्यांच्यासाठी ही सेवा अतिशय सोयीची ठरणार आहे. याद्वारे त्यांना तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि पावसाची माहिती मिळत राहील. या सेवेला weatherunion.com असे नाव देण्यात आले आहे. सध्या ही सेवा ४५ शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications