मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकाचे काम प्रगती पथावर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर 508 किलोमीटरच्या मार्गावरील 12 स्थानकांचे काम वेगाने सुरु आहे. गुजरातमधील साबरमती, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलिमोरा आणि वापी येथून आठ (08) स्थानके आणि महाराष्ट्रात बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी चार (04) स्थानकांचा समावेश आहे.

संपूर्ण मार्गावरील बुलेट ट्रेन स्थानकांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. गुजरातमधील आठही स्थानकांच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून सुपरस्ट्रक्चरचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. कॉरिडॉरवरील स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सर्व आधुनिक आणि अद्ययावत सुविधा असणार आहेत.

तिकीट आणि वेटिंग एरिया, बिझनेस क्लास लाउंज, नर्सरी, टॉयलेट, स्मोकिंग रूम, इन्फॉर्मेशन बूथ, रिटेल सेंटर आणि पब्लिक इन्फॉर्मेशन अँड अनाउंसमेंट सिस्टीम असेल. याशिवाय, ऑटो, बस आणि टॅक्सीसारख्या स्टेशनवर चांगल्या, जलद आणि त्रासमुक्त कनेक्टिव्हिटीसाठी वाहतुकीच्या सर्व मूलभूत साधनांशी एकत्रिकरण करून काही स्थानके ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित केली जाणार आहेत.

गुजरातमधील स्थानकांची प्रगती

- वापी - 425/425 मीटर रेल्वे लेव्हल स्लॅब पूर्ण झाला आहे

- बिलीमोरा -425/ 425 मीटर रेल्वे लेव्हल स्लॅब पूर्ण झाला आहे

- सुरत - 450/450 मीटर रेल्वे लेव्हल स्लॅब पूर्ण झाला आहे

- भरुच - 425/350 मीटरपैकी 350 मीटरचे काम पूर्ण झाले आहे.

- वडोदरा - 425/425 मीटर पहिल्या मजल्यावरील स्लॅप टाकण्याचे काम प्रगती पथावर

- आणंद - 425/425 मीटर रेल्वे लेव्हल स्लॅब पूर्ण झाले

- अहमदाबाद- 435/435 मीटर पूर्ण झाले

- साबरमती - 425/425 मीटर पहिला मजला : सर्व 9 स्लॅब पैकी 3 स्लॅब पूर्ण झाले आहेत

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+