Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Womes Day 2025 : 'तू आदिशक्ती तुच महाशक्ती', शायरीतून पाठवा खास महिला दिनाच्या शुभेच्छा!

womens day 2025 shayari quotes wishes in Marathi : आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, जो केवळ एक तारीख नाही तर महिला शक्तीचा सन्मान करण्याचा आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा दिवस आहे. असं म्हणतात की जर मुलगा शिकला तर घर शिक्षित होते पण जर मुलगी शिकली तर संपूर्ण समाज शिक्षित होतो. स्त्री ही केवळ फुलासारखी नाजूक नाही तर ती दुर्गेचे एक रूप देखील आहे.

जर महिला घरात स्वयंपाक करते तर त्या आकाशात रॉकेट देखील उडवू शकतात. तुम्ही सुंदर संदेशांद्वारे महिला सक्षमीकरणाचा दिवस संस्मरणीय बनवू शकता, येथे आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम संदेश घेऊन आलो आहोत. जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता आणि हा दिवस कायमचा संस्मरणीय बनवू शकता. चला तर महिला दिनाच्या द्या शायरीतून खास शुभेच्छा...!

womens day 2025

  • स्त्री म्हणजे एक खडतर वाट
  • अशक्य ते शक्य करून दाखवणारी
  • अन्यायाला न्याय मिळवून देणारी
  • जी बदलेल समाजाची वहिवाट
  • जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

womens day 2025

ती असेल सोबत तर जीवन आपले सुवर्ण

ती नसेल सोबत तर सारे जीवन अपूर्ण

तिच्यामुळेच आपल्या घराला घरपण

म्हणूनच जुपया मित्रांनो तिच्यातील सुरेख बाईपण

हॅप्पी वुमन्स डे 2025

  • अन्नपूर्णा तू, लक्ष्मीही तूच
  • तूच या जगाची दुर्गामाता
  • वेळेप्रसंगी बनतेस कालीमाता
  • पण तरीही रोमारोमात तुझ्या भरलीये
  • प्रेम, ममता, कणखरता
  • महिला दिनाच्या शुभेच्छा

ती आहे म्हणून विश्व आहे,

ती आहे म्हणून सुखी घर आहे,

ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,

अन् केवळ ती आहे,

म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे!

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

womens day 2025

  • तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
  • तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा
  • जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

इंग्रजीत म्हणतात लेडी

मराठीत म्हणतात महिला

तुझ्याचमुळे सखे

आम्ही श्वास घेतो पहिला

कायम करूया स्त्रीचा सन्मान

महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,

स्त्री म्हणजे प्रत्येक चांगल्या वाईट क्षणातील साथ

तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

  • तुझ्यामुळे जन्म माझा
  • पाहिले हे जग मी,
  • कसे फेडू ऋण तुझे
  • अनंत जन्माचा कृतज्ञ मी
  • हॅपी वुमन्स डे 2025

सर्व जबाबदा-या यशस्वीपणे पार पाडत

सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणा-या

नारी शक्तीला सलाम

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

  • आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी,
  • मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
  • आजच्या युगाची प्रगती तू...
  • जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+