काय सांगता..! भारतात टेलिग्राम बॅन होणार? वाचा, नेमकं काय आहे प्रकरण

Telegram :गृह मंत्रालय व सायबर क्राइम डिपार्टमेंट खंडणी व जागारासारख्या गुन्ह्यांच्या अनुषंगानेही टेलिग्रामची स्वतंत्र चौकशी करत आहे. त्यामुळे भारतात टेलिग्राम बँन होण्याची शक्यता वाढली आहे. तपासात जी माहिती समोर येईल, त्याद्वारे कारवाई होणार असल्याचे समजते.

टेलिग्राम या सोशल नेटवर्कींग साईटचे संस्थापक व सीईओ पावेल ड्युराव यांना शनिवारी पँरिमध्ये अटक झाली. भारतातही अनेक गुन्ह्यात यापूर्वी टेलिग्रामचा सहभाग असल्याचा आरोप होता आला आहे. आता भारतातील या अँपच्या संदर्भातील सर्व प्रकरणांची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती आहे.

Will Telegram be banned in India  Read  what exactly is the case

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर आणि इलेक्ट्राँनिक्स अँण्ड इन्फाँर्मेशन टेक्नाँलाँजी मंत्रालयाने टेलिग्रामवरील पी2पी कन्युनिकेशनची चौकशी करत आहे.

अनेक गुन्ह्यात आढळला टेलिग्रामचा सहभाग

टेलिग्राम हे भारतातील लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. टेलिग्रामचे भारतात सुमारे 50 लाखांहून अधिक युजर आहेत. मात्र, टेलिग्राम ॲपवर अनेक प्रकारचे गंभीर आरोप यापूर्वी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पेपर लीकमध्येही टेलिग्राम अॅपचं नाव समोर आलं होतं.

याशिवाय टेलिग्रामवर खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं टेलिग्रामची चौकशी सुरू केली आहे. त्यातच फ्रांसच्या पॅरिस एयरपोर्टवरुन टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव यांना अटक करण्यात आल्यानंतर भारतात हे अँप बॅन होण्याची चर्चा सुरु झाली.

पावेल यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी टेलिग्रामचा वापर केल्याचा आरोप आहे. दरम्यान, टेलिग्रामचे प्रमुख पावेल दुरोव यांना अटक केल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं (आयटी) गृह मंत्रालयाकडून माहिती मागवली आहे. यामध्ये त्यांनी भारतातही ॲपद्वारे कोणतेही उल्लंघन केलं आहे का, असा सवाल केला आहे. आयटी मंत्रालयानं याबाबत कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

टेलिग्रामवर भारतात झालेत आरोप

1. भारतात 3 मे, 2023 रोजी, अनेक NEET-UG अर्जदारांना परीक्षेच्या एक दिवस आधी वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरच्या काही प्रती मिळाल्या. यानंतर देशभरात वाद निर्माण झाला होता. या प्रती पाच हजार ते 10 हजारांना विकल्याचा आरोप झाला होता. दरम्यान, आयटी मंत्रालयानं एमएचएकडून अहवाल मागवला आहे. त्यात हे पेपर टेलिग्रामवरुन पाठविण्यात आल्याचा आरोप होता.

2. त्यानंतर 19 जून 2023 रोजी होणारी UGC-NET परीक्षा टेलिग्रामवर पेपर लीक झाल्याच्या एका दिवसानंतर रद्द करण्यात आली. या समस्येवर लक्ष वेधताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "आम्ही मूळ UGC-NET प्रश्न टेलिग्रामवरील प्रश्नांशी जुळवून पाहिले आणि ते अगदी तंतोतंत जुळले आहेत.

3. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) नं टेलिग्रामच्या माध्यमातून चालवलेलं स्टॉक प्राईस रिगिंग रॅकेट 24 जुलै रोजी उघडकीस आणलं होतं.

4. भोपाळमधील दोघांना स्थानिक डॉक्टरांची 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यामध्येही या लोकांनी टेलिग्रामचा वापर केला होता. ही घटना 3 मे रोजी घडली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+