Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PM Modi News : पीएम मोदींनी रामपाल कश्यप यांना स्वःतच्या हाताने का बूट घालायला लावले? बघा व्हिडिओ

Why PM Modi made Rampal Kashyap wear shoes with his own hands : देशाचे पंतप्रधान म्हटले की, सर्वात प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते आणि आपल्या देशाचे पंतप्रधानपद भुषवलेल्या सर्वच नेत्यांचा चेहरा समोर येतो. एवढी लोकप्रियता आणि ताकद या पदात असते, पण एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्यक्तीला स्वःतच्या हाताने बुट घालायला लावल्याचे चित्र समोर आले आहे. याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे.

Why PM Modi made Rampal Kashyap wear shoes

पीएम नरेंद्र मोदी यांची 14 एप्रिलला हरियानातील हिस्सार येथे एक मोठी रॅली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींनी यमुनानगरमधील जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांना हरियाणातीलच रामपाल कश्यप नावाची व्यक्ती भेटली. त्यानंतर त्या व्यक्तीला पंतप्रधानांनी आस्थेवाईकपणे विचारणा केली आणि स्वःतच्या हाताने त्याला बुट घालायला लावले, आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण पीएम मोदींना असे का केले? हा प्रश्न आता समोर येत आहे. त्याची उत्तरे आपण जाणून घेऊया.

पंतप्रधानांनी का घालायला लावले बूट?

पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, आज मला हरियाणातील यमुनानगरमधील कैथलच्या रामपाल कश्यप जी यांना भेटण्याची संधी मिळाली. 'जोपर्यंत मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि मी त्यांना भेटत नाही तोपर्यंत मी जोडे घालणार नाही' अशी शपथ त्यांनी 14 वर्षांपूर्वी घेतली होती. मला आज त्याला बुट घालायला मदत करण्याची संधी मिळाली. अशा सर्व मित्रांच्या भावनेचा मी आदर करतो, पण मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अशी प्रतिज्ञा घेण्याऐवजी काहीतरी सामाजिक किंवा राष्ट्रीय कार्य करण्याची प्रतिज्ञा करावी.

कोण आहे रामपाल कश्यप?

रामपाल कश्यप हा हरियाणातील कैथल जिल्ह्यातील रहिवासी आहे. नरेंद्र मोदी जेव्हा देशाचे पंतप्रधान होईपर्यंत आणि जोपर्यंत ते स्वत: पंतप्रधान मोदींना भेटत नाहीत तोपर्यंत मी चपला घालणार नाही, अशी शपथ त्यांनी 14 वर्षांपूर्वी घेतली होती. जी आता पुर्ण झाली आहे.

हेही वाचा : मोदी सरकारचं खासदारांना मोठं गिफ्ट; पगार, भत्ता, पेन्शन सगळंच वाढवलं; वाढलेले आकडे पाहून फिरतील डोळे

हेही वाचा : काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष का केला नाही? PM मोदींचा काँग्रेसला सवाल, सडेतोड भाषणातील 5 मुद्दे वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+