सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे टाँप-५ अर्थमंत्री कोणते? वाचा संपूर्ण यादी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वेळी सुमारे दीड तास भाषण करुन त्यांनी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे भाजपकडून सांगितले गेले. गेल्यावेळी माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या सलग सात अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांनी मोडला. देशमुख यांनी ६९ वर्षांपूर्वी हा विक्रम केला होता. यंदा त्या प्रणव मुखर्जी यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत.

Budget 2025

सीतारामन यांचाही विक्रम

निर्मला सीतारामन यांनी गेल्यावेळी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रम मोडला. मोरारजी देसाई यांनी सलग सहा अर्थसंकल्प मांडले होते. भारताच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम पी. चिदंबर यांच्या नावे आहे. त्यांनी ९ अर्थसंकल्प सादर केले. त्यानंतर प्रणव मुखर्जी (८), सी. डी.देशमुख (७), मोरारजी देसाई (६), मनमोहन सिंग (५), यशवंत सिन्हा (५) या अर्थमंत्र्‍यांचा क्रमांक लागतो.

चिदंबरम यांचाही आहे विक्रम

अनुभवी राजकारणी पी. चिदंबरम यांनी नऊ वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी नऊ अर्थसंकल्प सादर केले. त्यांनी मनमोहन सिंग व अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली काम केले. त्यांच्या कार्यकाळात बजेट एकत्रीकरण, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, पायाभूत सुविधा या विकासांवर लक्ष दिले गेले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+