Shashi Tharoor : 3 लग्न, काँग्रेस सरकारमध्ये मंत्री आता PM मोदींनी खास जबाबदारी दिलेले शशी थरुर कोण?
Who is Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांचे 7 शिष्टमंडळ तयार केले आहेत. हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सदस्य देशांना भेट देणार आहे.

या शिष्टमंडळाचे नैतृत्व काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर हे करणार आहेत. काँग्रेसकडून त्यांचे नाव दिले नाही तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची नियुक्ती यासाठी केली. त्यामुळे त्यांच्या नावावरुन आता वाद पेटला आहे. शशी थरूर यांचे नाव कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले नव्हते. तरी देखील त्यांचे नाव जाहीर झाल्याने कॉंग्रेस विरुद्ध शशी थरूर असा वाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे शशी थरुर जास्त चर्चेत आले आहेत. शशी थरुर हे नाव घेतले की, त्यांच्या वक्तव्यांची आणि लग्नांची चर्चा जास्त होते. ते कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहतात, म्हणूनच शशी थरुर कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.
कोण आहेत शशी थरुर?
- शशी थरुर हे माजी आंतरराष्ट्रीय राजनयिक, शशी थरूर हे केरळमधील एक ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत.
- शशी थरूर आता केरळमधील तिरुअनंतपुरम येथून खासदार आहेत.
- काँग्रेसचे सदस्य म्हणून त्यांनी या प्रदेशात सलग दोन निवडणुका जिंकल्या आहेत.
- दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग प्रशासनातील यूपीए सरकारच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश होता.
- 1956 मध्ये जन्मलेले डॉ. थरूर यांचे शिक्षण भारत आणि अमेरिकेत झाले, त्यांनी 1978 मध्ये फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी येथे पीएचडी पूर्ण केली.
- संयुक्त राष्ट्रांमधील त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, त्यांनी कोफी अन्नान यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सरचिटणीस, निर्वासित कार्यकर्ते आणि प्रशासक म्हणून काम केले.
शशी थरुर यांचे वैयक्तिक जीवन
- डॉ. शशी थरूर यांचा जन्म 9 मार्च 1956 (वय 69) झाला आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाशी ते संबंधित आहेत.
- शिक्षण - डॉक्टरेट
- व्यवसाय - राजनयिक लेखक,
कौटुंबिक पार्श्वभुमी
शशी थरुर यांच्या वडीलांचे नाव चंद्रन थरूर तर आईचे नाव लिली थरूर आहे. शशी थरुर यांची आधी दोन लग्न झाली होती. त्यानंतर त्यांचा सुनंदा पुष्कर यांच्याशी विवाह झाला. त्यांच्या या विवाहाची खूप चर्चा झाली. सुनंदा पुष्कर एक प्रसिद्ध भारतीय-कनाडाई व्यवसाय होत्या, त्यांचा जन्म 27 जून 1962 रोजी झाला आणि 17 जानेवारी 2014 रोजी नवी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. शशी थरुर यांना दोन मुलं आहेत.
आंतरराष्ट्रीय लेखक, स्तंभलेखक
- शशी थरुर यांनी द न्यू यॉर्क टाईम्स, द वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियन इत्यादी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले आहे ते लेखक आहेत.
- शशी थरुर यांनी न्यूजवीक इंटरनॅशनलसाठी योगदान-संपादक आणि अधूनमधून स्तंभलेखक म्हणूनही काम केले.
- 2006 मध्ये, भारत सरकारने थरूर यांना संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवपदासाठी नामांकित केले. थरूर दक्षिण कोरियाच्या बान की-मूननंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
- मनमोहन सिंग प्रशासनात त्यांना परराष्ट्र मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.
- डॉ. शशी थरूर यांनी विविध पुस्तके लिहिली यात 18 सर्वाधिक विक्री होणारी पुस्तकांचा समावेश आहेत.












Click it and Unblock the Notifications