सरन्यायधीश गवईंवर बुट फेकणारे वकील राकेश किशोर कोण आहे? का केला हल्ला? जाणून घ्या कारण
Who is Rakesh Kishor : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात ६ ऑक्टोबर २०२५ हा दिवस एककाळीमा म्हणून नोंदवला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख, सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर एका वकिलाने थेट कोर्टरूममध्ये बूट फेकण्याचा प्रयत्न केला! ही केवळ एक घटना नाही, तर संपूर्ण देशाला हादरवणारा आणि न्यायपालिकेच्या सन्मानाला आव्हान देणारा धक्कादायक प्रकार आहे.

नियमानुसार सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान अचानक हा अपमानास्पद प्रकार घडला. सुदैवाने, बूट CJI गवई यांच्यापासून दूर, त्यांच्या पायाजवळ पडल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. या अभूतपूर्व गोंधळातही न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेली अखंड शांतता आणि संयम उल्लेखनीय होता. त्यांनी कोणत्याही विचलित न होता, वकिलांना 'आपले युक्तिवाद सुरू ठेवा' असे सांगून सुनावणी थांबवली नाही, जो त्यांच्या न्यायिक धैर्याचा पुरावा आहे.
कोण आहे राकेश किशोर? (Who is Rakesh Kishor)
सरन्यायधीशांवर बुट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील नाव: राकेश किशोर
वय: ७२ वर्षे
राहणार: दिल्लीतील मयूर विहार परिसरात राहतात.
सदस्यत्व: तो केवळ दिल्ली बार कौन्सिलचेच नाही, तर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि शाहदरा बार असोसिएशनचेही नोंदणीकृत सदस्य आहेत.
CJI गवईंवर हल्ला का केला?
वकील राकेश किशोर याने केलेले हे कृत्य थेट धार्मिक भावनांशी जोडलेले आहे. या हल्ल्यामागे भगवान विष्णूच्या मूर्तीची पुनर्स्थापना संबंधित एका खटल्यातील CJI गवईंनी केलेली एक टिप्पणी मुख्य कारण आहे.
'ती' टिप्पणी होती का?
काही आठवड्यांपूर्वी, मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जवारी मंदिरात नुकसान झालेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात आली होती. १६ सप्टेंबर रोजी याचिका फेटाळताना CJI गवई यांनी याचिकाकर्त्याला उद्देशून केलेली टिप्पणी वादाचा विषय ठरली होती.
राकेश किशोरकडून निंदनीय कृत्य
"ही पूर्णपणे प्रचार हित याचिका आहे. जा आणि स्वतः देवालाच काहीतरी करण्यास सांगा. जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही भगवान विष्णूचे परम भक्त आहात, तर तुम्ही प्रार्थना करा आणि थोडे ध्यान करा." CJI गवई यांच्या या टिप्पणीमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. याच टिप्पणीचा निषेध करण्यासाठी आणि त्या वक्तव्यावर राग आल्याने वकील राकेश किशोर याने हे अत्यंत निंदनीय कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
हेही वाचा : CJI BR Gavai shoe throw attempt : खळबळजनक! सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न!












Click it and Unblock the Notifications