Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आज PM मोदींच्या वाढदिवस; जाणून घ्या पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन कशा जगतात जीवन? पेन्शन किती मिळते

Who is pm modi wife jashodaben How do you live life : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस. संपूर्ण देश 'सेवा पंधरवडा' म्हणून हा दिवस साजरा करत आहे. पण, या खास प्रसंगी अनेकांना एक प्रश्न पडतो, तो म्हणजे पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन कुठे आहेत, त्यांचे आयुष्य कसे आहे? पंतप्रधान मोदींच्या पत्नीची यापुर्वी चर्चाही झाली, आता पंतप्रधानांच्या पंचाहात्तराव्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जशोदाबेन यांची चर्चा होत आहे.

जशोदाबेन यांचे नरेंद्र मोदी यांच्यासोबत लग्न झाले पण नंतर दोघेही एकमेकांपासून दुरावले गेले. यानंतर नरेंद्र मोदी आपल्या संघाच्या कार्यात आणि पुढे राजकारणात सक्रीय झाले पुढे ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले व नंतर देशाचे पंतप्रधान झाले. तर जशोदाबेन यांनी आपले अर्धवट शिक्षण पुर्ण केले.

Who is pm modi wife jashodaben

सामान्य जीवन जगत आहेत जशोदाबेन

जशोदाबेन यांनी शिक्षण पुर्ण केल्यानंतर शिक्षिका म्हणून त्यांनी नोकरी केली, त्या आता निवृत्त शिक्षिका असून एक साधे आणि स्वावलंबी जीवन त्या जगत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची स्वतःची कमाई, जी त्यांना निवृत्त शिक्षिका म्हणून मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून आहे.

नरेंद्र मोदी आणि जशोदाबेन यांचे नाते

पंतप्रधान मोदी आणि जशोदाबेन यांचे नाते नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत, मोदींनी पहिल्यांदाच उमेदवारी अर्जात जशोदाबेन यांना आपली पत्नी म्हणून स्वीकारले. त्यापूर्वी ते स्वतःला अविवाहित असल्याचे जाहीर करत होते.

दोघे झाले वेगळे..

नरेंद्र मोदी आणि जशोदाबेन यांचे लग्न कमी वयातच, ठरवून झाले होते, पण लग्नानंतर लगेचच दोघे वेगळे झाले. जशोदाबेन यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले आणि त्या एक शिक्षिका बनल्या.

जशोदाबेन यांचे जीवन

  • जशोदाबेन १९७८ ते १९९० या काळात बनासकांठा जिल्ह्यात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आज त्या निवृत्त झाल्या आहेत आणि आपल्या भावासोबत राहतात.
  • पंतप्रधान मोदींच्या पत्नी असूनही त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा राजकीय समारंभात सहभागी होत नाहीत.
  • जशोदाबेन यांनी आपले जीवन साधेपणाने आणि एकांतवासात घालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या जास्त वेळ पूजा, भजन-कीर्तन आणि धार्मिक कामांमध्ये घालवतात.
  • जशोदाबेन यांचे हे आत्मनिर्भर आणि साधे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

जशोदाबेन यांना पेन्शन आणि इतर सुविधा

जशोदाबेन यांना पेन्शन व्यतिरिक्त काही सरकारी सुविधा देखील मिळाल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना शिक्षिका म्हणून दरमहा १४,००० रुपये पेन्शन मिळते, म्हणजेच त्यांची वार्षिक कमाई १ लाख ६८ हजार रुपये आहे. ही पेन्शन त्यांना त्यांच्या स्वतःच्या सेवेमुळे मिळते.

त्यांना सुरक्षा दिली जाते का... अन् सरकारी वाहन?

जशोदाबेन SPG (Special Protection Group) सुरक्षा मिळालेली नाही, जी फक्त पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला मिळते. त्याऐवजी, त्यांना गुजरात पोलिसांचे कमांडो २४ तास सुरक्षा पुरवतात. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना प्रवासासाठी एक सरकारी वाहन देखील उपलब्ध आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+