Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

6 महिन्यांत 12 बलात्कार,गर्भपात अन् धमकी! कोण आहे पद्मश्री साधू कार्तिक महाराज?, ज्यांच्यावर आरोप!

Swami Pradiptananda - Sadhu Kartik Maharaj News in Marathi : पद्मश्री सारख्या सर्वोच्च सन्मानाने ज्या साधूंचा देशाच्या राष्ट्रपतींनी सत्कार केला. अशा साधूंवर आता बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने त्यांच्याविरोधात गंभीर आरोप केले असून मागील सहा महिन्यांमध्ये जवळपास 12 हून अधिक वेळा महाराजांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केलाय.

चला तर संबंधित महाराज कोण आहेत, त्यांनी खरचं असं कृत्य केले आहे का, पीडितेचा आरोप काय आहे, आणि कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया..!

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील एका महिलेने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित साधू स्वामी प्रदीप्तानंद उर्फ 'कार्तिक महाराज' यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पीडितेने आरोप केला आहे की, 6 महिन्यांत 12 वेळा बलात्कार केला आहे. तर अनेकदा लैगिंक छळ व मानसिक त्रास दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, भारत सेवाश्रम संघाच्या बेलडांगा युनिटशी संबंधित साधू स्वामी प्रदीप्तानंद उर्फ ​​कार्तिक महाराज यांच्याविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली (FIR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pradiptananda Kartik Maharaj

पीडितेने काय केला आरोप?

महिलेचा दावा आहे की, महाराजांनी 2013 मध्ये शाळेत नोकरीचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. तथापि, महाराजांनी सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. कोलकाता येथील लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या घटनांनी बंगालचे राजकारण तापलेले असताना ही घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

स्वामी प्रदीप्तानंद कोण आहेत (who is Swami Pradiptananda-Kartik Maharaj)

स्वामी पद्मश्री प्रदीप्तानंद महाराज भारत सेवाश्रम संघाच्या बेलडांगा शाखेशी संबंधित आहेत. या वर्षी त्यांना चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री प्रदान करण्यात आला. कार्तिक महाराज हे बेलडांगा (मुर्शिदाबाद) शाखेचे प्रमुख आहेत. माध्यम वृत्तानुसार कार्तिक महाराज हे समाजसेवेशी देखील संबंधित आहेत. त्यांनी बेलडांगा येथील बचत आदिवासी विद्यालय, वसतिगृह, रुग्णालय यासह 12 हून अधिक सामाजिक संस्था सुरू केल्या आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला होता, ज्यांनी आरोप केला होता की ते राजकीय एजंटांना मतदान केंद्रांवर जाऊ देत नाहीत. कार्तिक महाराज यांनी अनेक भाजप नेत्यांसोबत सार्वजनिकरित्या परिषदा आणि कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. पद्मश्री मिळाल्यावर, त्यांना राजकीय आणि सामाजिक पातळीवर खूप विरोध झाला. विशेषतः टीएमसी, काँग्रेस आणि सीपीएमने आरोप केला की हा सन्मान फुटीरतावादी अजेंडा वाढवत आहे.

कार्तिक महाराज यांच्याविरुद्ध पीडितेने काय केला आरोप?

  • बंगाली महिलेने नबाग्राम पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती डिसेंबर 2012 मध्ये महाराजांना भेटली. त्याने तिला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि जानेवारी 2013 मध्ये त्याने तिला चाणक आदिवासी अवसिक बालिका विद्यालयाच्या वसतिगृहात राहण्यासाठी जागा दिली.
  • महिलेच्या म्हणण्यानुसार, तो दररोज मला शाळेच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर घेऊन जात असे आणि माझ्यावर बलात्कार करत असे. तिने सांगितले की, एकदा महाराजांनी तिला पाच दिवस आश्रमात राहण्यास सांगितले, जिथे तिच्यावर अनेक वेळा बलात्कार झाला.
  • महिलेने सांगितले की, 2013 मध्ये, जेव्हा ती गर्भवती राहिली, तेव्हा महाराजांनी शाळेतील कर्मचाऱ्यांसह बेरहमपूरमधील एका खाजगी नर्सिंग होममध्ये जबरदस्तीने तिचा गर्भपात केला. महिलेने तिच्या जबाबात म्हटले आहे की, मी नकार दिला तेव्हा मला धमकी देण्यात आली. डॉक्टरांना बोलावण्यात आले आणि कर्मचाऱ्यांसमोर माझा गर्भपात करण्यात आला.
  • पीडितेने सांगितले की, महाराजांनी अनेक वेळा तिला नोकरीचे आश्वासन दिले, परंतु प्रत्येक वेळी तो तिला फसवत असे आणि वेगवेगळ्या आश्रमात तिचे लैंगिक शोषण करत राहिला. महिलेने म्हटले आहे, शेवटी माझे मानसिक संतुलन बिघडू लागले. अखेर मी तक्रार करण्याचा निर्धार केला.
  • महिलेने दावा केला की 12 जून 2025 रोजी तिने महाराजांशी संपर्क साधला, त्यानंतर महाराजांनी तिला 13 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता बेरहमपूरमधील एका ठिकाणी थांबण्यास सांगितले. तिथे दोन व्यक्ती आल्या, ज्यांनी तिला गाडीत बसण्यास सांगितले. गाडीत त्यांनी धमकावले, शिवीगाळ केली आणि नंतर तिला रस्त्यावर ढकलून दिले. महिलेने प्रशासनाकडे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बलात्काराच्या आरोपानंतर कार्तिक महाराजांचे मत काय?

या प्रकरणावर कार्तिक महाराजांनी सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले आहे की, हे सर्व माझ्याविरुद्धचे षड्यंत्र आहे. वेळच सत्य उघड करेल. आमच्या आश्रमात अनेक महिला काम करतात आणि सर्वांना आईसारखा आदर दिला जातो."

त्यांनी सांगितले की, या षड्यंत्राचा उद्देश त्यांचे नाव आणि प्रतिष्ठा बदनाम करणे आहे. ते म्हणाले, "मी एक संन्यासी आहे. संन्यासीच्या आयुष्यात असे अडथळे येणे असामान्य नाही." महाराज म्हणाले की त्यांची कायदेशीर टीम या प्रकरणावर न्यायालयात उत्तर देईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+