कधी आहे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण? जाणून घ्या तारीख, वेळ आणि ग्रहणकाळात काय खबरदारी घ्यावी
When is the second solar eclipse of the year 2025 : सण 2025 वर्षात मार्च महिन्यात एक सूर्यग्रहण होते, जे भारतात दिसलेले नाही, त्याचा भारतात कोणताही प्रभाव नव्हता. अशातच आता वर्षातील दुसरे सूर्यग्रहणासंदर्भातील माहितीचे वेध आतापासूनच लागले आहेत. आज आपण वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी आहे याची माहिती जाणून घेऊया.

कधी आहे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण?
चालू वर्षातील दुसरे सूर्यग्रहण हे 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10:59 वाजता सुरू होईल. या दिवशी अश्विन अमावस्या असेल. हे देखील आंशिक सूर्यग्रहण असेल. 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3:23 वाजता त्याचा समारोप होणार आहे.
भारतात सूर्यग्रहण दिसणार का?
21 सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागराच्या काही भागातून दिसेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा भारतात कोणताही परिणाम किंवा प्रभाव रहणार नाही. याचाच अर्थ म्हणजे सुतक काळचा नियम लागू होणार नाही.
वर्षातील पहिले चंद्रग्रहण कधी झाले?
यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी, होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी झाले. हे ग्रहण सिंह राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात झाले. भारत वगळता, हे ग्रहण ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागांमध्ये, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक महासागर, पूर्व आशिया आणि अंटार्क्टिकाच्या बहुतेक भागात दिसले होते.
वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी झाले?
वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च 2025 रोजी चैत्र अमावस्येच्या दिवशी झाले. ते मीन राशी आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होते. भारत वगळता युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर या भागातही ते दृश्यमान होते.
ग्रहण काळात काय करू नये
- ग्रहण काळात घरात पूजा करू नये.
- या काळात गर्भवती महिलांनी घरातच थांबावे.
- झोपणे टाळा. जेवण करु नये, पाणीही पिऊ नये.
- देवी-देवतांच्या मूर्तींना हात लावू नये.
- ग्रहण पाहण्याची चूक करू नका.
- ग्रहण काळात जास्त धावणे टाळावे.
- या काळात स्वयंपाकघरातील कोणतेही काम करू नका, तसेच अन्नही खाऊ नका.
- ग्रहण काळात महिलांनी मेकअप करू नये.
- कात्री, सुरी, सुई इत्यादी धारदार व टोकदार वस्तू चुकूनही वापरू नका.
- ग्रहण काळात नामस्मरण, जप करता येईल.
सूर्यग्रहण म्हणजे काय?
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान येतो, तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यापासून रोखतो. या स्थितीमुळे पृथ्वीवर चंद्राची सावली पडते, ज्यामुळे सूर्य आंशिक किंवा पूर्णपणे दिसणे थांबते, यालाच सूर्यग्रहण म्हणतात.
सूर्यग्रहणाचे प्रकार
खंडग्रास सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती असे तीन प्रकार आहेत. जेव्हा चंद्र सूर्याच्या कडेचा फक्त एक भाग झाकतो, तेव्हा आंशिक सूर्यग्रहण असते. जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो, तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते. जेव्हा चंद्र सूर्याच्या कडेला पूर्णपणे झाकत नाही, तर सूर्याचा एक कडा दिसतो, याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.












Click it and Unblock the Notifications