Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जॉर्ज सोरोस अन् सोनिया गांधी यांचा संबंध काय?, भाजप नेत्यांच्या रडारवर असलेले जॉर्ज सोरोस कोण आहेत?

What is relationship between George Soros and Sonia Gandhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावर बुधवारी अविश्वास प्रस्ताव आणण्यासंदर्भात नोटीस दिली. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने जगदीप धनखड यांचा जोरदार बचाव केल्याचे पाहायला मिळाले. अशातच भाजपने धनखड यांची पाठराखण करत कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि अमेरिकन उद्योगपतील जॉर्ज सोरोस यांच्यातील कथित संबंध असल्याचा आरोप केला.

देशविरोधी काम करणाऱ्या संस्थांना पैसा पुरविण्याचे काम जॉर्ज सोरोस हे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरुन राज्यसभेत चांगलाच गदारोळ झाला तर दिवसभर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

भाजपने सोनिया गांधी व जॉर्ज सोरेस यांच्यातील संबंधावरुन आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. चला तर जाणून घेऊया जॉर्ज सोरोस नेमके कोण आहेत, त्यांचा उद्योग काय आहे, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे.

George Soros and Sonia Gandhi

भाजपने नेमका काय आरोप केला?

सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?

भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले. "फोरम फॉर डेमोक्रॅटिक लीडर्स ऑफ एशिया पॅसिफिक या संघटनेसोबत सोनिया गांधी यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही, तर या फोरममध्ये भारताविरोधी आणि पाकिस्तानला समर्थन करणाऱ्या चर्चा होतात. या फोरमला जॉर्ज सोरोस फाऊंडेशनकडून निधी दिला जात आहे, सोनिया गांधी अन् जॉर्ज सोरोस यांचे या संस्थेच्या माध्यमातून संबंध असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

जेपी नड्डा यांनी काय केला आरोप?

राज्यसभेतील गदारोळावरुन सभागृह नेते जेपी नड्डा म्हणाले की, सत्ताधारी आघाडीचे सदस्य गेल्या दोन दिवसांपासून जॉर्ज सोरोस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्या यांच्यातील संबंधांचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांकडून आसनावर आक्षेप घेण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न केला जात आहे. तर केवळ आसनाचा मुद्दा करून हे लोक राज्यसभा अध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

पीटीआयच्या वृत्तानुसार, जेपी नड्डा म्हणाले की, "जॉर्ज सोरोस आणि सोनिया गांधी यांच्यात काय संबंध आहे? हा देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा प्रश्न आहे. या संबंधांवर चर्चा करताना देशाच्या सार्वभौमत्वावरही प्रश्नचिन्ह आहे. मुख्य विरोधी पक्ष आणि जॉर्ज सोरोस यांच्यात संबंध आहेत. त्यांनी मुद्दा वळवण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न केला आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधींशी संबंध असलेले जॉर्ज सोरोस कोण आहेत?

जॉर्ज सोरोस हे अमेरिकन उद्योजक आहेत. त्यांनी 1992 मध्ये शॉर्ट सेलिंगद्वारे बँक ऑफ इंग्लंडला डबघाईला आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यांचा जन्म हंगेरीतल्या ज्यू कुटुंबात झाला. जर्मनीत ज्यू लोकांचा छळ केला जात असताना ते कसेतरी बचावले. त्यानंतर मग पाश्चिमात्य देशात आसरा घेतला होता.

शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सोरोस यांनी यातूनच तब्बल 44 अब्ज डॉलर कमावले. या पैशांतून त्यांनी हजारो शाळा आणि हॉस्पिटल सुरू केल्याचे सांगितले जाते. तसंच, लोकशाही आणि मानवाधिकार यांच्यासाठी काम करणाऱ्या संघटनांची देखील त्यांनी मदत केली.

सोरोस यांनी 1979 मध्ये सोसायटी फाउंडेशनची स्थापना केली असून हे फाउंडेशन जवळपास 120 देशांमध्ये काम करतेय. त्यांच्या अशाच कामांमुळे ते उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या निशाण्यावर असतात. त्यांनी 2003 मध्ये इराक युद्धावर टीका केली. तसंच, डेमोक्रॅटिक पक्षाला लाखो डॉलर्सचा निधी दिला. यानंतर अमेरिकेतील उजव्या विचारणीच्या लोकांकडून त्यांच्यावर टोकाची टीका करण्यात आली होती.

जॉर्ज सोरोस यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल?

2020 मध्ये, दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील भाषणादरम्यान, जॉर्ज सोरोस यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका केली होती. सरकार एकाधिकारशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोरोस यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यावर टीका केली आणि मोदी सरकारवर फूट पाडणारी धोरणे राबवल्याचा देखील आरोप केला होता.

जॉर्ज सोरोस यांनी नरेंद्र मोदींना जागतिक स्तरावर लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्या 'राष्ट्रवादी नेत्यांपैकी एक' असे वर्णन केले. त्यांच्या वक्तव्यावर भारतीय नेत्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता.

NGO ला निधी दिल्याचा आरोप

जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फाउंडेशन (OSF) वर भारतातील सरकारी धोरणांचा विरोध करणाऱ्या एनजीओ आणि कार्यकर्त्यांना निधी पुरवल्याचा आरोप आहे. सोरोस यांच्या संस्थेने CAA आणि 2020 च्या कृषी कायद्यांविरोधातील निदर्शनांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलेला आहे. भारतीय एजन्सींनी OSF शी संबंध असल्याचा संशय असल्याच्या एनजीओची चौकशी केली आहे आणि त्यांच्यावर 'देशविरोधी' कारवायांद्वारे देश अस्थिर करण्याचा आरोप केला आहे.

फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा

काही भारतीय समालोचक आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी दावा केला आहे की, जॉर्ज सोरोसचा निधी अप्रत्यक्षपणे खलिस्तान राज्याची वकिली करणाऱ्यांसह फुटीरतावादी चळवळींना समर्थन देतो. या आरोपांमुळे जॉर्ज सोरोसची भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणारे व्यक्ती म्हणून संबंध जोडले गेले.

जॉर्ज सोरोस संदर्भातील काय आहेत जागतिक वाद?

1. शेअर बाजारातील फेरफार

सोरोस यांच्या आर्थिक कारनाम्यांमध्ये 1992 च्या 'ब्लॅक वेन्सडे क्रायसिस'चाही समावेश आहे, ज्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. पैसा कमावण्यासाठी विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था अस्थिर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शेअर बाजारात फेरफार करण्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे.

2. राजकीय हस्तक्षेप

जॉर्ज सोरोस यांनी इमिग्रेशन, LGBTQ अधिकार आणि इतर देशांतील सरकारविरोधी निदर्शने यांना निधी देऊन राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हंगेरी आणि रशियासारख्या देशांनी त्यांच्यावर त्यांच्या देशांतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे, तर उजव्या विचारसरणीचे नेते जागतिक स्तरावर त्यांना राष्ट्रीय सार्वभौमत्वासाठी धोका मानतात.

3. षड्यंत्र सिद्धांत केंद्रस्थानी

जॉर्ज सोरोस हे अनेकदा कट सिद्धांतांच्या केंद्रस्थानी असतात, विशेषतः उजव्या विचारसरणीच्या गटांकडून, त्यांच्यावर त्यांचा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी जागतिक निषेध किंवा संकटे भडकवल्याचा आरोप केला जातो. सोरोस हे अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्याचे समीक्षक सोरोसला एक धूर्त आणि शक्तिशाली अब्जाधीश मानतात जो आपली संपत्ती अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी आणि सार्वभौम राष्ट्रांच्या राजकीय घडामोडींवर प्रभाव टाकण्यासाठी वापरतो.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+