दिल्लीत NSG ला पाचारण! 'ब्लॅक कॅट' कमांडो काय करणार? जाणून घ्या NSG विषयी सगळं काही
देशाच्या राजधानीतील ऐतिहासिक लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ सोमवारी, १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी एका कारमध्ये शक्तीशाली स्फोट झाला. या भीषण घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात आग लागली आणि भीतीचे वातावरण पसरले.

घडलेल्या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, अग्निशमन दल, तसेच देशाची प्रमुख दहशतवादविरोधी यंत्रणा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (NSG) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) च्या टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्फोटाचे स्वरूप आणि कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने तपास युद्धपातळीवर सुरू आहे. हा घातपात होता की अपघात, याबाबत तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत.
विशेष म्हणजे, या स्फोटाच्या दिवशीच हरियाणातील फरिदाबाद येथे २९०० किलो स्फोटक बनवण्यासाठी लागणारे अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचाही तपास यंत्रणा घेत आहेत.
कुठल्या परिस्थितीत एनएसजीला पाचारण केले जाते?
एनएसजी (NSG) म्हणजे काय?
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (National Security Guard - NSG) हे भारताचे प्रमुख दहशतवादविरोधी दल (Counter-Terrorism Force) आहे. १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यानंतर झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्याची स्थापना करण्यात आली. या दलाला 'ब्लॅक कॅट कमांडो' म्हणूनही ओळखले जाते.
#WATCH | Delhi: The NSG team, along with a sniffer dog, at the spot in Delhi where the blast took place in a Hyundai i20 car today at around 7 pm.
— ANI (@ANI) November 10, 2025
Due to the blast, eight people have died so far. pic.twitter.com/qFAcCjX0Cn
पाचारण करण्याचे निकष
एनएसजीला खालीलसारख्या अत्यंत गंभीर आणि विशेष परिस्थितीत पाचारण केले जाते:
- दहशतवादी हल्ला (Terrorist Attack): देशातील कोणत्याही भागात मोठा दहशतवादी हल्ला झाल्यास किंवा त्याची शक्यता असल्यास. उदा. २६/११ मुंबई हल्ला.
- अपहरण (Hijacking): जमीन, हवा किंवा समुद्रात होणाऱ्या अपहरणाच्या (Hostage Situation) परिस्थितीत लोकांना सुरक्षित सोडवण्यासाठी आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी.
- बॉम्ब निकामी करणे (Bomb Disposal): IED (सुधारित स्फोटक उपकरणे) शोधणे, निकामी करणे आणि स्फोटांचे स्वरूप तपासणे.
- पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशन (Post Blast Investigation): मोठा स्फोट झाल्यानंतर त्याच्या तांत्रिक बाजू तपासणे, स्फोटकांचे प्रकार निश्चित करणे आणि दहशतवादी कट उघडकीस आणणे.
हे ही वाचा - रिसिन, ३६० किलो RDX आणि दिल्ली स्फोट; हा निव्वळ योगायोग की काही भयंकर प्लॅनिंग?
दिल्लीत एनएसजीने काय केले?
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, हा संभाव्य दहशतवादी कट असू शकतो, या दृष्टीने तपास करण्यासाठी NSG टीमला पाचारण करण्यात आले.
- बॉम्ब निष्क्रियाकरण आणि फॉरेन्सिक तपास: NSG च्या तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्फोटाचा प्रकार, स्फोटकांचा वापर (उदा. IED), आणि स्फोट नेमका कोणत्या यंत्रणेद्वारे घडवून आणला गेला, याची तपासणी करण्यासाठी ते NIA आणि FSL (फॉरेन्सिक सायन्स लॅब) सोबत काम करत आहेत.
या अत्यंत संवेदनशील घटनेमुळे दिल्लीसह संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications