वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर! मोदी सरकारला देशातील लोकांत फूट पाडायचीय - विरोधकांची कठोर टीका
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले. हे विधेयक मांडत असतानाच संसदेत गदारोळ सुरू झाला. काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल राव यांनी सरकारला समुदायांमध्ये वाद निर्माण करायचा आहे. या विधेयकाबाबत सरकारचा हेतू चांगला नाही. तुम्हाला देशातील लोकांमध्ये फूट पाडायची आहे असा त्यांनी आरोप केला.
काय म्हणाले सपा खासदार?
सपा खासदार मोहिब्बुल्ला म्हणाले, वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिमांच्या हक्कांच्या विरोधात आहे. हे विधेयक धर्मात हस्तक्षेप करणारे आहे. असे झाले तर देशात अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटणार नाही. टीएमसीचे खासदार सुदीप बंदोपाध्याय, द्रमुकचे खासदार के. कनिमोळी यांनी हे विधेयक घटनाविरोधी म्हटले आहे.

वक्फ कायदा, 1995 मध्ये दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्ड कोणत्याही मालमत्तेवर स्वतःचा दावा करू शकणार नाही. सध्या वक्फला कोणतीही जमीन आपली मालमत्ता म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे. जमिनीवर दावा करण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी लागेल. त्यामुळे मंडळाची मनमानी थांबेल.
मंडळाच्या पुनर्रचनेमुळे मंडळाच्या सर्व विभागांसह महिलांचा सहभागही वाढेल. मुस्लिम विचारवंत, स्त्रिया आणि शिया आणि बोहरा यांसारखे गट प्रदीर्घ काळापासून विद्यमान कायद्यांमध्ये बदल करण्याची मागणी करत आहेत.
वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध कोण कोण बोलले?
#WATCH | Waqf (Amendment) Bill, 2024 moved in Lok Sabha
Congress MP KC Venugopal says, "...We are Hindus but at the same time, we respect the faith of other religions. This bill is specialized for the Maharashtra, Haryana elections. You do not understand that last time the… pic.twitter.com/cTrybNbRWo
— ANI (@ANI) August 8, 2024
#WATCH | Waqf (Amendment) Bill, 2024 moved in Lok Sabha
Congress MP KC Venugopal says, "...We are Hindus but at the same time, we respect the faith of other religions. This bill is specialized for the Maharashtra, Haryana elections. You do not understand that last time the… pic.twitter.com/cTrybNbRWo
हा संघराज्य संस्थेवर हल्ला
काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल म्हणतात, "...आम्ही हिंदू आहोत पण त्याच वेळी, आम्ही इतर धर्मीयांच्या श्रद्धेचा आदर करतो. हे विधेयक महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीसाठी खास आहे. तुम्हाला हे समजले नाही की गेल्या वेळी भारतातील लोकांना स्पष्टपणे तुम्हाला धडा शिकवला हा फेडरल सिस्टमवर हल्ला आहे..."
हे कलम 30 चे थेट उल्लंघन
द्रमुकच्या खासदार कनिमोळी म्हणाल्या, "हे कलम ३० चे थेट उल्लंघन आहे जे अल्पसंख्याकांना त्यांच्या स्वतःच्या संस्था चालवण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. हे विधेयक एका विशिष्ट धार्मिक गटाला लक्ष्य करत आहे."
वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ कोण काय बोलले?
जेडीयूचे खासदार आणि केंद्रीय पंचायत राज मंत्री लालन सिंह म्हणाले "या विधेयकाला मुस्लिमविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे विधेयक मुस्लिमविरोधी नाही. हे विधेयक मशिदींना लागू होणार नाही. कायद्याच्या बंधनात एक हुकूमशाही संस्था आणली जात आहे."
हे विधेयक मागे घ्या - सुप्रिया सुळे
वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 ला विरोध करताना लोकसभेत एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी सरकारला विनंती करतो की हे विधेयक एकतर पूर्णपणे मागे घ्यावे किंवा स्थायी समितीकडे पाठवावे... कृपया सल्लामसलत केल्याशिवाय अजेंडा पुढे ढकलू नका. ..."












Click it and Unblock the Notifications