Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती बिघडली, मध्यरात्री अचानक एम्स रुग्णालयात केले दाखल

Vice President Jagdeep Dhankhar admitted to hospital : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना एम्स रुग्णालयात मध्यरात्री नेण्यात आलं आहे. अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत दुखू लागल्यानं त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं असल्याची माहिती पीटीआयने दिलीय. जगदीप धनखड यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना मध्यरात्री दोन वाजता रुग्णालयात नेण्यात आलं.

Jagdeep Dhankhar

आयसीयूमध्ये सुरू आहेत उपचार

सध्या त्यांच्यावर क्रिटिकल केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. कार्डियॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजीव नारंग हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याबाबत अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाहीय.

जेपी नड्डा यांनी केली प्रकृतीची विचारणा

वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, उपराष्ट्रपतींची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. धनखर यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि ते एम्समध्ये पोहोचले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+