Baghpat accident: जैन उत्सवाचा स्टेज कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू, 20-25 जण जखमी
Baghpat accident: उत्तर प्रदेशमधील बागपत येथील बरौत येथे मंगळवारी जैन निर्वाण महोत्सवादरम्यान एक मोठा अपघात झाला आहे. येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान लाकडी स्टेज कोसळल्याने दोन डझनहून अधिक लोक जखमी झाले. जखमींमध्ये महिला आणि मुलांसह पुरूषांचाही समावेश आहे.
मानस्तंभावर भाविक लाडूचा प्रसाद ठेवत असताना घडली आहे. त्यावेळी भाविक मोठ्या संख्येने व्यासपीठावर जमा झाले होते. अचानक स्टेज कोसळला आणि बरेच लोक खाली पडले. या दरम्यान अनेक लोक स्टेजच्या खाली अडकले आहेत. घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले.

या दुर्घटनेत 5 ते 6 जणांच्या मृत्यूची झाल्याची माहिती आहे. तर सुमारे 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक उपचारानंतर 20 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. इतरांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अस्मिता लाल यांनी दिली आहे.
#WATCH बागपत: DM अस्मिता लाल ने बताया, " घटना में लगभग 40 लोगों के घायल होने की सूचना मिली थी। सभी को अस्पताल पहुंचा दिया गया। 20 लोगों को प्राथमिक उपचार के बाद घर भेज दिया है। 5 लोगों की मृत्यु हुई है।" https://t.co/jjYnNfuvhh pic.twitter.com/UfXBGJ4Aao
— ANI_HindiNews (@AHindinews) January 28, 2025
जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. एसपी अर्पित विजयवर्गीय आणि अतिरिक्त एसपी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी सांगितले की 20-25 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी 2-3 लोक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.
बरौत येथील दिगंबर जैन महाविद्यालयाच्या मैदानात भगवान आदिनाथांच्या निर्वाणासाठी लाडू अर्पण करण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक पोहोचले होते. लोकांची संख्या जास्त असल्याने स्टेजवर जास्त दबाव आला आणि स्टेज कोसळले. दरम्यान या घटनेमागील कारणांबद्दल अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
घटनेची माहिती देताना एसपी अर्पित विजयवर्गीय म्हणाले की, जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.












Click it and Unblock the Notifications