Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आता.. तिरुपती लाडूंवरील FSSAI च्या अहवालाची प्रतीक्षा! सरकार म्हणते तक्रारी आल्या का तपासावे लागेल

तिरुपती लाडूत प्राण्यांची चरबी असल्याच्या एका खासगी संस्थेच्या अहवालानंतर आता लाडूसंदर्भात एफएसएसआय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) अहवालाची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे भेसळीच्या आरोपांवरील वादाच्या दरम्यान, या लाडूंसदर्भात याआधी काही तक्रारी होत्या का हे तपासावे लागेल असे सरकार म्हणाले तर ग्राहक व्यवहार विभागाने काही कारवाई करणे आवश्यक आहे का? याची चाचपणही केली जात आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी नुकताच दावा केला होता की, मागील वायएसआरसीपी सरकारने तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात लोकप्रिय लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर केला होता, या पार्श्वभूमीवर आता हे प्रकरण तापले आहे.

Tirupati Laddu Dispute Case

लाडूत चरबी प्रकरणी विशेष पथकाची घोषणा

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 22 सप्टेंबर रोजी तिरुपती लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. कारण हिंदू मंदिरे आणि त्यांच्या 'प्रसाद' च्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी पावले उचलण्याच्या मागणी होत आहे. त्या धर्तीवर विशेष पथक तपास करणार आहे.

चरबी अन् माशांच्या तेलाचे घटक वापरल्याचा आरोप

तत्पुर्वी आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल सापडल्याची खात्री प्रयोगशाळेच्या अहवालात झाली आहे. सीएम चंद्रबाबू नायडू यांनी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर तिरुपती लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट घटक वापरल्याचा आरोप केला होता.

काय आहे प्रयोगशाळेचा अहवाल

तिरुपती लाडूमध्ये गोमांस, डुकराची चरबी वापरली जाते, प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, एनडीडीबी सीएएलएफ या खासगी प्रयोगशाळेने तयार केलेल्या तपासणी अहवालात असे समोर आले आहे की, तिरुपती लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यात पाम तेल, फिश ऑइल, बीफ फॅट आणि चरबीचा समावेश आहे (डुक्कर चरबी) आढळले. ही प्रयोगशाळा पशुखाद्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या चाचणीवर लक्ष केंद्रित करते.

चंद्रबाबू नायडू यांचा आरोप काय

चंद्राबाबू नायडू यांच्या खुलाशांवरून राजकीय खळबळ उडाली आहे.'तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे मंदिर हे आमचे सर्वात पवित्र मंदिर आहे. वायएस जगन मोहन रेड्डी प्रशासनाने तिरुपती प्रसादममध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली हे जाणून मला धक्का बसला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+