सर्वात मोठी बातमी ! 'टिकटॉक'चे भारतात पुनरागमन? ५ वर्षांनंतर वेबसाईट सुरू, ॲप.....

चीनच्या 'टिकटॉक' या शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्मची वेबसाईट जवळपास पाच वर्षांनंतर भारतात पुन्हा सुरू झाली आहे, मात्र त्याचे मोबाइल ॲप्लिकेशन अजूनही उपलब्ध नाही. शुक्रवारी अनेक वापरकर्त्यांनी 'टिकटॉक'च्या अधिकृत वेबसाईटला ॲक्सेस करता येत असल्याची माहिती दिली, पण कंपनीने अद्याप भारतात 'टिकटॉक' पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

tiktok-india-comeback-website-live

'टिकटॉक'वर बंदी का घालण्यात आली होती?

२९ जून २०२० रोजी, गलवान खोऱ्यातील संघर्षांनंतर भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेची कारणे देत 'टिकटॉक'सह इतर अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. या संघर्षात २० भारतीय सैनिक शहीद झाले होते, जो गेल्या काही दशकांतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सर्वात मोठा संघर्ष होता. तेव्हापासून हे ॲप देशभरात बंद आहे.

भारत आणि चीनमध्ये संबंध सुधारण्याचे संकेत?

भारत सरकार किंवा 'टिकटॉक'ची मूळ कंपनी 'बाइटडान्स' (ByteDance) यांनी अद्याप बंदी अधिकृतपणे उठवण्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, हा घटनाक्रम भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याचे संकेत देत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. वांग यी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून आगामी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेसाठी निमंत्रण दिले.

या भेटीदरम्यान, दोन्ही देशांनी 'स्थिर, सहकार्यात्मक आणि भविष्यवेधी' भागीदारीसाठी उपाययोजना जाहीर केल्या. यामध्ये सीमावर्ती व्यापार पुन्हा सुरू करणे, द्विपक्षीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, थेट विमानसेवा सुरू करणे आणि सीमेवर शांतता राखणे यांचा समावेश आहे.

अमेरिकेनेही 'टिकटॉक'वर कारवाई

'टिकटॉक'ला फक्त भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही अडचणींचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेमध्ये, माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गेल्या एप्रिलमध्ये एका कायद्यावर स्वाक्षरी केली, ज्यात 'बाइटडान्स'ला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेतील आपले कामकाज दुसऱ्या कंपनीला विकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर कंपनीने असे केले नाही, तर अमेरिकेत 'टिकटॉक' बंद केले जाईल.

गुरुवारी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात चीनचे राजदूत झू फेईहोंग यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, "अमेरिकेने भारतावर ५०% पर्यंत टॅरिफ लावले आहेत आणि आणखी टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. चीन याच्या पूर्णपणे विरोधात आहे." फेईहोंग यांनी पुढे म्हटले की, बीजिंग (चीन) SCO परिषद यशस्वी करण्यासाठी भारत आणि इतर सदस्य देशांसोबत काम करण्यास तयार आहे. त्यांनी दोन्ही देशांनी 'ड्रॅगन-एलिफंट टँगोचा नवा अध्याय' सुरू करावा, असे आवाहन केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+