Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मंकीपॉक्सचा धोका! बंगळुरू विमानतळाचा मोठा निर्णय, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट अनिवार्य

Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे. विदेशातून आलेल्या एका व्यक्ती संशयित आढळल्याने त्याला विलगिकरणात ठेवण्यात आले, त्याची तपासणी केल्यानंतर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, या घटनेनंतर बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) ने विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली लागू केली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात दिल्ली विमानतळावर एक रुग्ण मंकीपॉक्सबाधित आढळल्यानतंर बंगळुरू विमानतळ प्राधिकरणाने हे सतर्कतेचे पाऊल उचलले आहे. यामुळे विषाणू पसरण्यावर पायघड्या घालता येतील. तर आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Monkeypox

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, विदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाने टेस्ट केली की नाही या ठिकाणी चार पथके स्थापन केली आहेत. दररोज सुमारे 2,000 प्रवाशांची तपासणी केली जात आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी यााबाबत सतर्कता घेतली आहे. स्क्रीनिंग, चाचणी आणि ट्रॅकिंगमध्ये सुरळीत कामकाजाची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बंगळुरू विमानतळ प्राधिकरणाच्या प्रवक्तांनी सांगितले की, केआयए मंकीपॉक्सला प्रतिबंध घालण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सर्व आरोग्य व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जाते. विमानतळावर येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे नियमित स्क्रिनिंग केले जात आहे.

या देशातून आलेल्या विमानांवर विशेष लक्ष

मंकीपॉक्स विषाणूने प्रभावित असलेल्या देशामधून जे लोक विमानतळावर दाखल होत आहेत. त्यांची विशेष चाचणी केली जात आहे. प्रामुख्याने आफ्रिकन राष्ट्रांमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे. ज्याप्रमाणे कोविडच्या काळात विमानतळावर निर्बंध लावण्यात आलेले होते. अगदी त्याप्रमाणे या ठिकाणी नियमावली पाळली जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संक्रमित आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीला विलगीकरणात ठेवले जाईल. त्यानंतर 21 दिवसांच्या क्वारंटाईन अंतर्गत ठेवले जाईल. उपचारानंतर पुन्हा चाचणी घेतली जाईल आणि जेव्हा व्यक्तींना विषाणूमुक्तीची पुष्टी होईल तेव्हाच त्यांना सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

कर्मचारी व प्रवाशांची सुरक्षा हेच प्राधान्य

BIAL चे प्रवक्तांनी सांगितले की, आमच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य अधिकारी सज्ज आहेत. कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवली तरी आम्ही त्यात परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहोत. दुसरी बाब म्हणजे प्रवासी आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. म्हणूनच खरबरदारीचे उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मंकीपॉक्स लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, त्वचेवर पुरळ, तीव्र डोकेदुखी, स्नायू सूज येणे आणि पाठदुखी यांचा समावेश होतो. विमानतळावरील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "ही लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे, कारण उपचार न केलेली प्रकरणे जीवघेणी ठरू शकतात. सध्या Mpox साठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत, त्यामुळे प्रसार रोखण्यासाठी लवकर शोध घेणे आणि प्रतिबंध करणे महत्वाचे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+