Bajirao Peshwa: मुघलांपुढे झुकले नाही.!; प्रेरणादायी मेसेज पाठवून थोरले बाजीरावांना करा अभिवादन
Thorle bajirao peshwa punyatithi 2025 : श्रीमंत पहिला बाजीराव पेशवा यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी, म्हणजेच 325 वर्षांपूर्वी झाला होता. 28 एप्रिल 1740 रोजी वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. असे असूनही, त्यांचा इतिहास खूप गौरवशाली आहे. त्यांची पालखीची लढाई जिंकली. यामध्ये मुघलांचा पराभव झाला आणि मराठा साम्राज्याचा दक्षिण भारतात विस्तार झाला. त्यांनी एकही लढाई हारली नाही. देशभरात मराठा साम्राज्याचा विस्तार केला.
त्यांच्या कर्तृत्वाला सलाम. त्यांच्या पुण्यतिनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला खाली दिलेले फोटो शेअर करू शकता. तसेच त्यांच्या जीवनासंदर्भातील संदेश देखील पाठवून पेशवा बाजीराव यांचे स्मरण करा.

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ते छत्रपती सम्राट शाहू महाराज यांच्या दरबारात पेशवे बनले. 1720 ते 1740 असा त्यांचा कार्यकाळ राहिला. त्यांचे पूर्ण नाव बाजीराव बाळाजी भट असे आहे. वयाच्या 40 व्या वर्षी 28 एप्रिल 1740 रोजी निधन झाले.

जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता!
स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारे
'आपले थोरले बाजीराव' होते.
बाजीराव पेशव्यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता.!
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता.
जय भवानी.. जय शिवाजी..
थोरले बाजीरावांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्वराज्यासाठी लढला तो,
तमाम मराठ्यांसाठी
तळपती आग होता तो
थोरले बाजीरावांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वंदन!

भगव्याची ज्यांनी राखली शान
मुघलांपुढे कधीही न झुकविली त्यांनी मान
ज्यांच्या शौर्यापुढे आपण आहोत सूक्ष्म जीवासमान
असे थोरले बाजीरावांना कोटी कोटी प्रणाम!
शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी,
स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा योद्धा होता पेशवा बाजीराव!
हे ही वाचा : 41 युद्धे लढली, एकही हारले नाही; मुघलांसह इंग्रजही त्यांना घाबरत, वाचा-थोरले बाजीराव पेशवेंची कहाणी
पाहुनी शौर्य तुजपुढे
मृत्यूही नतमस्तक जाहला
स्वराज्याच्या मातीसाठी, तुम्ही अमर जाहला!
थोरले बाजीरावांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
मृत्यूला मारण्याचा होता कावा,
हे धाडस बाळणारा फक्त तोच एक पेशवा!
श्रीमंत थोरले बाजीराव यांना
पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
रणांगणी रक्ताने माखले अंग जरी,
शौर्यास ज्याच्या किंचीतही भंग नाही,
मृत्यूस न भीता अवघा रणकंद झाला,
तया प्रणाम कोणी दुजा वंद्य नाही..
श्रीमंत थोरले बाजीरावांना
पुण्यतिथीनिमित् विनम्र आदरांजली!
41 युद्धे जिंकणारा योद्धा
भारताच्या इतिहासात, पेशवे बाजीराव पहिले हे एकमेव महान योद्धा होते, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात 41 युद्धे लढली आणि एकही युद्ध हरले नाही. तसेच, वीर महाराणा प्रताप आणि वीर छत्रपती शिवाजी यांच्यानंतर, बाजीराव पेशवे प्रथम यांचे नाव येते ज्यांनी सतत मुघलांशी बराच काळ लढा दिला.












Click it and Unblock the Notifications