Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्लीतील मुस्लिम बहुल मतदारसंघात काय झाले? कमळाने नेमकी काय जादू केली? वाचा सविस्तर...

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस आज सकाळपासून सुरुवात झाली. बारा वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजप ४६ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष फक्त २४ जागांवर आघाडीवर दिसत आहे. काँग्रेस, एमआयएम व इतरांना तर अजून खातेही उघडता आलेले नाही. अशा स्थितीत दिल्लीतील मुस्लिम बहुल जागांवर कुणाचा विजय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र प्राथमिक कलानुसार या जागांवरही भाजपने सरशी साधली आहे.

delhi assembly election 2025

कोणत्या आहेत मुस्लिमबहुल जागा?

आप व काँग्रेसने गेल्यावेळी म्हणजेच २०२० ला एकत्रित निवडणुका लढविल्या होत्या. मात्र यंदा आपने स्वबळाचा नारा दिल्याने या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले. या दोन्हींकडे मुस्मिम मतदार राहिल, अशी अपेक्षा होती. दिल्लीतील ७० विधानसभा जागांपैकी सात मतदारसंघ हे मुस्लिमबहुल आहेत. तेथे मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. मातिया महल, बाबरपूर, सीलमपूर, ओखला, मुस्तफाबाद, चांदणी चौक आणि बल्लीमारने या सात जागा मुस्लिम बहुल समजल्या जातात. या जागांकडे यंदाही लक्ष होते.

भाजपने साधली सरशी

भाजपने यंदाच्या निवडणुकीत मोठ-मोठी आश्वासने देत आप व काँग्रेसचा पारंपारिक मुस्लिम मतदार फोडण्यात यश मिळवल्याचे प्राथमिक कलानुसार दिसत आहे. महिलांना २५०० रुपये मानधन, गरीब महिलांना गॅस सिलेंडरवर ५०० रुपये अनुदान, गर्भवती महिलांना २१ हजार आदी महिलांसाठीच्या घोषणांनी महिला मतदारांना भुरळ घातली. त्यामुळे या सातही जागांवर सध्यातरी भाजप पुढे दिसत आहे.

ओखला जागेवर भाजप पुढे

आम आदमी पक्षाचे विद्यमान आ. अमानतुल्ला खान हे ओखला विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर आहेत. भाजपच्या मनिष चौधरी व काँग्रेसच्या अरिबा खान यांच्यात येथे जोरदार लढत पहायला मिळत आहे. एमआयएमनेही या मतदारसंघात दिल्ली दंगलीतील आरोपी शिफा उर रहमान याला तिकीट दिले आहे. या जागेच्या प्राथमिक निकालावरुन भाजपचे चौधरी येथे सुरुवातीला आघाडीवर दिसत आहेत. म्हणजेच मुस्लिम बहुल मतदारसंघातही कमळ फुलल्याचे चित्र दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+