कठुआत लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 4 जवानांना वीरमरण; 6 जखमी
श्रीनगर - पोलिस आणि सुरक्षा दलाचे संयुक्त पथक मच्छेडी भागात अतिरेक्यांचा शोध घेत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करत लष्कराच्या वाहनावर हल्ला चढवला. यामध्ये चार जवान शहीद झाले असून सहा जवान जखमी झाले आहेत.
ही घटना सोमवारी (8 जुलै) जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील लोही मल्हार ब्लॉकमधील माचेरीच्या बदनोटा गावात घडली.

सध्या माचेरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस आणि सुरक्षा दलाचे संयुक्त पथक मच्छेडी परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेत होते. त्यावेळी हा हल्ला झाला.आता या भागात अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. हा भाग भारतीय लष्कराच्या 9 कोअर अंतर्गत येतो.
दोन महिन्यातील दुसरा हल्ला
दोन महिन्यांत लष्कराच्या वाहनावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी 4 मे रोजी पूंछमधील शाहसीतार भागात हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. यात कॉर्पोरल विकी पहाडे शहीद झाले होते तर अन्य 4 जवान जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दोन गाड्यांवर जोरदार गोळीबार केला. दोन्ही वाहने सनई टोपकडे जात होती.
रविवारी (7 जुलै) सकाळी दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात लष्कराच्या तळावर हल्ला केला होता. यामध्ये एक जवान जखमी झाला. जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी घनदाट जंगलातून पळून गेले. त्यानंतर लष्कर आणि पोलिस संयुक्तरित्या शोध मोहीम राबवत आहेत.
लष्करी वाहनांवर यापूर्वी झालेले हल्ले
1. या वर्षी 12 जानेवारीला जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. यानंतर जवानांना प्रत्युत्तर दिले. यात कोणी जखमी किंवा ठार झाल्याचे वृत्त नाही.
2. 21 डिसेंबर रोजी सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये 5 जवान शहीद झाले.दहशतवाद्यांनी अमेरिकन एम-4 कार्बाइन असॉल्ट रायफलमधून स्टीलच्या गोळ्या झाडल्या होत्या. या पोलादी गोळ्या लष्कराच्या वाहनांच्या जाड लोखंडी पत्र्यांमधून जाऊन सैनिकांच्या अंगावर आदळल्या.
3. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये 6 आणि 7 जुलै रोजी मुद्राघम आणि चिन्निगाम फ्रिसालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. या चकमकीत सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन जवानही शहीद झाले होते.
4. 26 जून रोजी डोडा जिल्ह्यातील गंडोह भागात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिस दलातील विशेष ऑपरेशन ग्रुपचा एक जवानही जखमी झाला आहे.
5. 22 जून: उरीमध्ये 2 दहशतवादी ठार
6. 19 जून : हडीपोरा येथे दोन दहशतवादी ठार
7. 17 जून: बांदीपोरामध्ये एलईटी कमांडर ठार












Click it and Unblock the Notifications