मोठा अपघात : काम सुरु असलेला बोगदा कोसळला; बोगद्यात ३० कामगार...

काम सुरु असलेल्या बोगद्याचा भाग कोसळल्याने आतमध्ये काम करणारे ३० कामगार बोगद्यात दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तेलंगणातील नगरकुरनूल जिल्ह्यातील शीशैलम लेफ्ट बँक कालव्याच्या बांधकामात हा अपघात झाला. अगोदर सहा ते आठ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यात ३० कामगार असल्याचे आता समोर आले आहे.

accident in Telangana

८ कामगार अडकल्याची भीती

पोलिसांनी सांगितले की, बांधकाम कंपनीचे एक पथकाने बोगद्याच्या आत जाऊन पाहणी केली आहे. त्यांनीही आत कामगार अडकल्याची पुष्टी केली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ठेकेदार कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सहा ते आठ कामगार अडकल्याची भीती आहे. अधिकारी म्हणाले, काही कामगार कामासाठी बोगद्यात गेले असताना बोगद्याच्या आत १२-१३ किलोमीटर अंतरावर छप्पर कोसळल्याने ही घटना घडली.

मुख्यमंत्र्‍यांनी दिले आदेश

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने अपघातस्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका अधिकृत निवेदनानुसार, बोगद्याच्या आत १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या डाव्या बाजूचे छत तीन मीटरने कोसळल्याचे वृत्त आहे. बोगदा कोसळण्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, "बोगदा कोसळल्याची आणि अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळताच, मुख्यमंत्र्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना सतर्क केले. त्यांनी जिल्हाधिकारी, एसपी, अग्निशमन विभाग, हायड्रा आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

मदतकार्य वेगाने सुरु

या अपघातानंतर मदत आणि बचावकार्य सध्या वेगाने सुरू करण्यात आले आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने प्रयत्न सुरू केले आहेत. घटनेची चौकशी करण्यासाठी आणि कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. स्थानिक अधिकारी आणि मदत कर्मचारी पूर्ण तयारीनिशी घटनास्थळी उपस्थित आहेत. अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी जलद गतीने काम सुरू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+